*पशुधन उत्पादनात विविध चारा पिकांचे महत्त्व-मा.डॉ. नागरत्ना बिरादार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पशुधन उत्पादनात विविध चारा पिकांचे महत्त्व-मा.डॉ. नागरत्ना बिरादार*
*पशुधन उत्पादनात विविध चारा पिकांचे महत्त्व-मा.डॉ. नागरत्ना बिरादार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्रात "चारापिक लागवड प्रशिक्षण" दि.11 फेब्रूवारी 2026, बुधवार रोजी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. नागरत्ना बिरादार, प्रमुख शास्त्रज्ञ, IGFRI, धारवाड, डॉ. विनोदकुमार, प्रमुख शास्त्रज्ञ, IGFRI, धारवाड, डॉ. नरेंद्र कुलकर्णी, प्रमुख शास्त्रज्ञ, IGFRI, धारवाड, विशेष अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सभापती गणेश पराडके, सामाजिक कार्यकर्ते, धडगाव व नीता पाटील यशोदा समन्वयक नंदुरबार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, राजेद्र दहातोंडे यांनी कृषी विज्ञान केंद्र मार्फत राबवण्यात येणाऱ्या विवध उपक्रमाची माहिती दिली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीव्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालन करणे योग्य असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. नागरत्ना बिरादार, प्रमुख शास्त्रज्ञ, IGFRI, धारवाड, यांनी आदिवासी उपयोजनेचे उद्देश पटवून दिले. तसेच आय जी एफ आर आय या संस्थेची भूमिका पशुपालकांना सांगितले. डॉ. विनोदकुमार, प्रमुख शास्त्रज्ञ, IGFRI, धारवाड, यांनी चारा पिक उत्पादनात चाराच्या बियाण्याचं महत्त्व मांडले. पशुधनासाठी वापरण्यात येणाऱ्या चाऱ्यामध्ये विविधता असणे फार महत्त्वाचे असते असे त्यानी सांगितले. पशुधन उत्पादन हे चारा पिकावर पूर्णतः अवलंबून असल्यामुळे आपण चारा पिके आपल्या शेतातील बांधावर किंवा जनावरांच्या आवश्यकतेनुसार एक दोन तीन गुंठे किंवा एक दोन एकर चारा लावणे गरजेचे आहे. डॉ. नरेंद्र कुलकर्णी, प्रमुख शास्त्रज्ञ, IGFRI, धारवाड, यांनी चारा पिकांमध्ये कीटकनाशकाचा वापर टाळण्याचे आव्हान. सर्वसाधारणपणे आपण चारा पिकातील कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे केल्यामुळे आपल्याला चाऱ्यामध्ये अधिक उत्पादन आणि दर्जेदार चारा मिळेल. कार्यक्रमाच्या शेवटी आय जी एफ आर आय मार्फत आदिवासी उपयोजनेच्या माध्यमातून एकुण 100 पशुपालकांना पशुखाद्य मिनरल मिक्स्चर तसेच चार पिकाची बियाणं वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले यांनी पशुपालक बांधवांना चारा पीक लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच पशुधन वाढीसाठी चारा पीक हा घटक फार महत्त्वाचा असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या प्रशिक्षणात कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. खुशाल राठोड, विषय विशेषज्ञ (पशुवैद्यकीय) व आभार प्रदर्शन उमेश पाटील, विषय विशेषज्ञ (कृषी विद्या) कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांनी केले.



