*सातपुड्याच्या कुशीत रंगणार निसर्गाचा उत्सव, 20 फेब्रुवारीपासून ‘तोरणमाळ महोत्सव 2026’ ला सुरुवात-शशांक काळे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सातपुड्याच्या कुशीत रंगणार निसर्गाचा उत्सव, 20 फेब्रुवारीपासून ‘तोरणमाळ महोत्सव 2026’ ला सुरुवात-शशांक काळे*
*सातपुड्याच्या कुशीत रंगणार निसर्गाचा उत्सव, 20 फेब्रुवारीपासून ‘तोरणमाळ महोत्सव 2026’ ला सुरुवात-शशांक काळे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे 20 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान ‘तोरणमाळ-रंग निसर्गाचे महोत्सव 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा तीन दिवसीय महोत्सव असून, यात आदिवासी संस्कृतीचे दर्शन, पारंपरिक लोककला आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची पर्वणी पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
स्थानिक कला, संस्कृती, परंपरा यांचा प्रचार, पर्यटनाला चालना आणि स्थानिक रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश असून महोत्सवामध्ये आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक लोककला, लोकनृत्य, लोकसंगीत, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, स्थानिक हस्तकला वस्तूंचे दालन, मुलांसाठी खेळ आणि सेल्फी पॉईंट्सचा समावेश आहे. कमळ तलाव, सीता खाई, यशवंत तलाव, सनसेट पॉईंट यांसारख्या प्रमुख पर्यटनस्थळांचा प्रचार-प्रसार महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे असून या महोत्सवामुळे हे थंड हवेचे ठिकाण पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे समोर येईल, अशी अपेक्षा आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा: दिवस पहिला (20 फेब्रुवारी):दुपारी 3 वाजता उद्घाटन समारंभ, सायंकाळी 4 ते 7 आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम आणि 7 ते 9 भोजन व स्थानिक चर्चा सत्र.
दिवस दुसरा (21 फेब्रुवारी): सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत स्थानिक पर्यटनस्थळांना भेटी, सायंकाळी 4 ते 7 सांस्कृतिक कार्यक्रम 7 ते 9 भोजन व स्थानिक चर्चा सत्र. दिवस तिसरा (22 फेब्रुवारी): सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत ट्रेकिंग व योग सत्र आणि सकाळी 11 वाजता समारोप समारंभ. इच्छुक पर्यटकांनी महोत्सवाच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन नोंदणीसाठी https://toranmalfestival.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी काळे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



