*नंदुरबार महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन माडातर्फे पथराई येथे,जयपालसिंग मुंडा प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन माडातर्फे पथराई येथे,जयपालसिंग मुंडा प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा*
*नंदुरबार महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन माडातर्फे पथराई येथे,जयपालसिंग मुंडा प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन (माडा) यांच्या जयपालसिंग मुंडा प्रिमीयर लिग (JMPL) या आदिवासी डॉक्टरांच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पथराई येथील के. डी.गावीत संस्थेच्या क्रिकेट मैदानावर झाले. सकाळी 8: 30 वाजता ह्या रोमहर्षक सामन्याचे उद्घाटन के.डी. गावीत संस्थेचे संस्थापक राजेंद्र गावित यांच्या हस्ते आदिवासी पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. या सोहळ्यात सुमारे 200 पेक्षा जास्त आदिवासी डॉक्टर उपस्थित राहिले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन करताना राजेंद्र गावित सरांनी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले आणि खेळाचे महत्त्व सांगितले. सदर स्पर्धेमुळे डॉक्टरांना दैनंदिन तणावातून मुक्त होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. ह्या उद्घाटन प्रसंगी के. डी.गावित संस्थेच्या संचालिका इला गावित, डॉ विभूती गावित आणि ऋषिका गावित उपस्थित होते.
उद्घाटनात माडाचे अध्यक्ष डॉ राजेश वळवी ह्यांनी मागील आठ वर्षांपासून JMPL चे आयोजन करत असल्याचे सांगितले. सदर स्पर्धेत धडगाव, अक्कलकुवा, शहादा,तळोदा, नवापूर, नंदुरबार व शिरपूर तालुक्यातील डॉक्टर उपस्थित होते. सदर सामन्याच्या अनुषंगाने क्रिकेट सामन्याबरोबर आदिवासी डॉक्टरांचं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे ज्यात आदिवासी डॉक्टर व त्यांचे परिवार सहभागी होणार आहे. ह्या स्नेहसंमेलनात आदिवासी फॅशन शो, आदिवासी क्रांतिकारी देखावा व नृत्य आणि गाण्याची स्पर्धा होणार आहे, ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदिवासी संस्कृती ची जनजागृती आणि अस्मितेचा जागर करण्यात येणार आहे.



