*ओल्या काजूंनी बहरली झाडे,काजूगर बाजारात दाखल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओल्या काजूंनी बहरली झाडे,काजूगर बाजारात दाखल*
*ओल्या काजूंनी बहरली झाडे,काजूगर बाजारात दाखल*
राजापूर(प्रतिनिधी):-शहरासह राजापूर तालुक्यातील बाजारपेठेंच्या ठिकाणी सध्या ओले काजूगर दाखल झाले असून यंदा काहीशा उशीरा बाजारपेठेत दाखल झालेल्या काजूगरासाठी खवय्यांना शेकडा तीनशे रुपये तर किलोमागे बाराशे रुपये मोजावे लागत आहेत. बागायती मध्ये यंदा ओल्या काजूंनी लगडलेली झाडे दृष्टीस पडत आहेत. कोकणात आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.कोकणातील हापूस आंबा व काजू जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात पाठवला जातो सध्या सुक्या काजू पेक्षा ओल्या काजूगराची मागणी अधिक असून ओले काजूगर विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्याचे चित्र गावागावात दिसत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारपेठेत कैऱ्या, काजू बी, बोंडू दाखल झाले असून ग्राहकांकडून सुध्दा त्याला चांगली पसंती मिळत आहे. यावर्षी अवकाळी पाऊस व दाट धुके यामुळे शेतकरी व बागायतदार वर्ग त्रस्त झाला आहे. सुरुवातीला आलेला मोहोर अवकाळी पावसाने काळवंडला असला तरी शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेत बागायतीचे रक्षण केले. सध्या बागांमध्ये तयार झालेल्या कैऱ्या व काजूगर विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत. वेगवेगळ्या कामानिमित्त कोकणात येणारे चाकरमानी आणि पर्यटक या कोकणी मेव्याकडे आकर्षिले जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात हा मेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.



