*कोल्हापुरात महायुतीला दे धक्का, काँग्रेस पुन्हा सत्तेत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोल्हापुरात महायुतीला दे धक्का, काँग्रेस पुन्हा सत्तेत*
*कोल्हापुरात महायुतीला दे धक्का, काँग्रेस पुन्हा सत्तेत*
कोल्हापूर(प्रतिनिधी):-कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे संपूर्ण निकाल जाहीर झाले तसे संपूर्ण जिल्ह्यात ठीक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. महायुतीने बाजी मारली असली तरी काँग्रेस पक्षाने महायुतीला घामटा फोडला आहे. या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा राजकीय समीकरणे पूर्ण बदलली होती. त्यामुळे विविध पक्षांनी अगदीच आप आपल्या पक्षासाठी कंबर कसली होती. यावेळी राष्ट्रवादीचे नेते स्व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 20 जागा जिंकल्या. तर काँग्रेसने 15 जागांसह दुसरे स्थान मिळवले. भाजपला 12, शिंदे गटाला 9 तर उबाठा गटाला 1 तर अन्य आणि अपक्षांना मिळून 10 जागा मिळाल्या आहेत. या निकालावरून कोल्हापूर जि.प महायुतीच सत्तेत येणार हे आता जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. हातकणंगले मतदारसंघात शिंदे शिवसेना पक्षाच्या सर्वच जागा निवडून आल्या आहेत. या मतदार संघात शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने आणि शिंदे सेनेचे माजी आमदार डॉ सुजित मिणचेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तसेच हातकणंगले मतदारसंघात ज्यांचा नजरा लागून राहिल्या होत्या तो हाय होल्टेज समजला जाणारा मतदारसंघ म्हणून भादोले जिल्हा परिषद व घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली आहे.
जिल्हा परिषद भादोलेमध्ये काँग्रेसच्या 7/12 च्या सौ सोनाली राहुल सावंत ( विजयी ) भादोले पंचायत समितीमध्ये जनसुराज्य पक्ष मुकुंद पाटील (विजयी) तसेच जनसुराज्य पक्षचा बालेकिल्ला समजला जाणारा घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या सौ शुभांगी महेश कुंभार (विजयी) तर पंचायत समिती मध्ये जनसुराज्य पक्ष्याच्या सौ कल्याणी राजवर्धन मोहिते (विजयी) तसेच नव पारगाव पंचायत समिती काँग्रेसचे भारत पाटील (विजयी) सर्वच विजयी उमेदवारांनी निकाल लागताच आप आपल्या मतदारसंघात गावात जल्लोष साजरा केला.
यावेळी या मतदार संघात नंबर 1 चा समजला जाणारा जनसुराज्य पक्ष मागे पडल्याचे चित्र आहे. वारणा खोऱ्याचे आमदार डॉ विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला सर्वच मतदारसंघात इच्छुक उमेदवार जास्त असल्याने त्यांच्या नाराजीचा फटका बसला असल्याचे बोले जात आहे. आता कोल्हापूरचा पुढील अध्यक्षा कोण होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महायुती की महाविकास आघाडी हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. घुणकी जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल, जिल्हा परिषद काँग्रेस पक्ष : सौ शुभांगी महेश कुंभार (विजयी)
घुणकी पंचायत समिती निकाल
जनसुराज्य पक्ष, सौ कल्याणी मोहिते (विजयी) नव पारगाव पंचायत समिती निकाल
काँग्रेस पक्ष भारत पाटील (विजयी) असा निकाल राहिला आहे.



