*घरं कसं काय बांधू? घरकुल लाभार्थी चिंतेत, वाळू आणण्यास अडवणूक करू नका-बिरसा फायटर्स़चे तहसिलदारांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*घरं कसं काय बांधू? घरकुल लाभार्थी चिंतेत, वाळू आणण्यास अडवणूक करू नका-बिरसा फायटर्स़चे तहसिलदारांना निवेदन*
*घरं कसं काय बांधू? घरकुल लाभार्थी चिंतेत, वाळू आणण्यास अडवणूक करू नका-बिरसा फायटर्स़चे तहसिलदारांना निवेदन*
धडगांव(प्रतिनिधी):-अक्राणी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना व इतर लोकांना रेती विकत आणण्यास विनाअट परवानगी मिळावी व रेती आणण्यास अडवणूक करू नये,या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स़ धडगाव संघटनेकडून तहसीलदार धडगाव यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अक्राणी हा आदिवासी बहुल तालुका असून आदिवासी बांधवांना पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना इत्यादी विविध सरकारी योजनांतर्गत घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. घर बांधण्यासाठी वीट, सिमेंट, वाळू -रेती, लोखंड इत्यादी अत्यावश्यक वस्तू आहेत. यापैकी घर बांधण्यासाठी रेती आवश्यकच असते.परंतू अक्राणी तालुक्यातील आदिवासी घरकुल लाभार्थ्यांना रेती आणण्यास महसूल प्रशासन मज्जाव करीत आहे, महाराष्ट्रात रेतीला रायल्टी लावण्यात येत नाही. नदी नाल्यांतील रेती ही महसूल प्रशासनाची आहे. त्यामुळे ती रेती कोणीही काढू शकत नाही. अशी विविध कारणे सांगून रेतीची वाहने प्रशासनाकडून अडवून कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य आदिवासी घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. रेती शिवाय आपलं घरं कसं बांधणार? घर बांधण्यासाठी आपल्याला रेती कोण देणार? अशे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. महसूल प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे आदिवासी घरकुल लाभार्थी आपले हक्काचे घर बांधण्यास वंचित आहेत. म्हणून अक्राणी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना व लोकांना रेती विकत आणण्यास विनाअट परवानगी देण्यात यावी, रेती आणण्यास अडवणूक केली जाऊ नये. अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स़ संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे.



