*कारमधून गाईच्या वासराची तस्करी करणा-या चोरट्याच्या मुस्क्या बांधल्या, रामतीर्थ पोलिसांची कौतुकास्पद कारवाई*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कारमधून गाईच्या वासराची तस्करी करणा-या चोरट्याच्या मुस्क्या बांधल्या, रामतीर्थ पोलिसांची कौतुकास्पद कारवाई*
*कारमधून गाईच्या वासराची तस्करी करणा-या चोरट्याच्या मुस्क्या बांधल्या, रामतीर्थ पोलिसांची कौतुकास्पद कारवाई*
नांदेड(प्रतिनिधी):-नायगांव तालुक्यातील नरसी चौरस्ता येथून गाईचे वासरू निर्दयीपणे कार मध्ये कोंबून चोरी करणाऱ्या चोरट्यांना रामतीर्थ पोलीसांनी अटक करुन मुसक्या बांधल्या आणि घटनास्थळी आणून गुन्ह्याची उकल केली. दिनांक 25 जानेवारी रोजी नरसी ता. नायगाव येथील मध्यवर्ती बँक परिसर दुभाजकावर गाय आणि वासरू बसले असल्याचे पाहून चोरट्यांनी वासराला कार कोंबून चोरटे पसार झाले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून आले वासराला वाचवण्यासाठी गाईने प्रयत्न केले होते मात्र गायीचे प्रयत्न फळाला आलेले नाहीत हे दृश्य सोशल मीडियावर पाहून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली होती.
गाईच्या वासराची कारमधून तस्करी झाल्या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानुसार स. पो. नि. विक्रम हराळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांचे सहकार्य घेऊन जलद गतीने तपास सुरू केला आणि या गुन्ह्यातील आरोपी शेख आश्रम पिताशकेल राहणार मनोरा ता. जि. पालघर, आयुब खान मुंब्रा जि. ठाणे, मोहम्मद अजीम मोहम्मद शिराज, नांदेड या तीन चोरट्यांना त्यांच्या XUV कार या वाहनांसह पकडून आज न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती रामतीर्थ पोलिसांनी दिली. बजरंग दलाकडून रामतीर्थ पोलिसांचे कौतुक निर्दयपणे गायची वासरू चोरणाऱ्या चोरट्यांना रामतीर्थ पोलीस ठाण्याचे स. पो. नि. विक्रम हराळे यांनी नरसी येथील घटनास्थळावर आणताच हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते व बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते घटनास्थळी येऊन गोमाता की जय, हर हर महादेव च्या घोषणा दिल्या आणि स. पो. नि. विक्रम हराळे यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले. आणि या भडव्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा चोरट्यांप्रती दिल्या.



