*साहित्योत्सव स्वागताध्यक्षपदी मंत्री अतुल सावे यांची निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*साहित्योत्सव स्वागताध्यक्षपदी मंत्री अतुल सावे यांची निवड*
*साहित्योत्सव स्वागताध्यक्षपदी मंत्री अतुल सावे यांची निवड*
छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी):-छत्रपती संभाजीनगर येथे येत्या 20, 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या साहित्यौसवाच्या स्वागताध्यक्षपदी इतर मागास बहुजन कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य भारती देवगिरी प्रांत आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे हा साहित्योसव आयोजित करण्यात आला आहे, या उत्सवाची जोरात तयारी सुरू असून उत्सव यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शहरातील ज्येष्ठ उद्योजक विकास कापरे हे या उत्सवाचे कार्याध्यक्ष आहेत. सरस्वती भुवनचे अध्यक्ष अॅड. दिनेश वकील हे उपाध्यक्ष तर प्रसाद शेरकर कोषाध्यक्ष, सुरेश जगाडे सहकोषाध्यक्ष आहेत, अशी माहिती साहित्योत्सवाचे निमंत्रक प्रा.डॉ. सर्जेराव जिगे, कार्यवाह डॉ. आर्कि. अनिरुध्द नाईक, साहित्य भारतीचे प्रांत अध्यक्ष प्राचार्य संजीव गिरासे, कार्याध्यक्ष उमेश काळे यांनी दिली आहे.



