ताजा खबरे:
*नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी, 28 फेब्रुवारीपर्यंत ई- केवायसी पूर्ण करावी-प्रदीप पवार*
*आदिवासी अकादमी नंदुरबारचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात संपन्न*
*कंजर भाट समाजातर्फे स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली*
*पोषण, प्रक्रिया व बाजारपेठेचा संगम, केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव*
*नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’-डॉ. संजीव वळवी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आदिवासी अकादमी नंदुरबारचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आदिवासी अकादमी नंदुरबारचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात संपन्न*

  • Share:

*आदिवासी अकादमी नंदुरबारचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संचलित आदिवासी अकादमी, नंदुरबार यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आयोजित सात दिवसीय विशेष हिवाळी शिबिराचा समारोप दि. 31 जानेवारी 2026 रोजी आदिवासी अकादमी परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समारोप समारंभास विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, अधिसभा सदस्य केदारनाथ कवडीवाले, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. दिनेश देवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित आदिवासी अकादमी, नंदुरबार येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाअंतर्गत आयोजित करण्यात आलेले हे पहिलेच विशेष हिवाळी शिबिर असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. इंगळे यांनी सांगितले की, समाजविकास प्रक्रियेत स्वयंसेवकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून सध्या विद्यापीठांतर्गत सुमारे वीस हजार एनएसएस स्वयंसेवक कार्यरत आहेत. कोरोना काळात राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन केल्याबद्दल स्वयंसेवकांचे कौतुक केले. तर अधिसभा सदस्य केदारनाथ कवडीवाले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे जीवनात स्वयंशिस्त, वेळ व संसाधनांचे योग्य नियोजन करण्याची क्षमता विकसित होत असल्याचे मत व्यक्त केले, दि. 25 जानेवारी 2026 रोजी या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य महेंद्र रघुवंशी, माजी सैनिक अरविंद निकम तसेच जिल्हा समन्वयक डॉ. विशाल करपे यांच्या हस्ते करण्यात आले होते. शिबिराच्या सात दिवसांच्या कालावधीत स्वयंसेवकांनी समाजजागृती, स्वच्छता अभियान, प्रभात फेरी, व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती, जलसंवर्धनासाठी श्रमदान, बंधारे बांधणी, बालविवाह प्रतिबंध, पर्यावरण संवर्धन, आदिवासी संस्कृती संवर्धन व शाश्वत विकास अशा विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविला.
शिबिरादरम्यान संविधान मूल्ये, राष्ट्रभक्ती, जबाबदार नागरिकत्व, कायदेविषयक प्रबोधन, ग्रामीण व आदिवासी विकास, युवा नेतृत्व, सांस्कृतिक जाणीव व पर्यावरण संरक्षण या विविध विषयांवर डॉ माधव कदम, ऍडव्होकेट बी एस बिरारे, ऍडव्होकेट गजमल वसावे, विशाल पाटील, डॉ श्रीराम दाउत खाने, श्री किर्तीवर्धन तायडे, अनिल सूर्यवंशी, केदारनाथ कवडीवाले अशा विविध तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विशेषतः नदीवर दोन ठिकाणी ‘पाणी अडवा – पाणी जिरवा’ या उपक्रमांतर्गत बंधारे बांधून जलसंवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला. तसेच व्यसनमुक्ती उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी व टोकरतलाव येथील युवकांच्या सहभागातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. दि. 30 जानेवारी रोजी बालविवाह व व्यसनधीनतेविरोधात प्रभावी पथनाट्य सादर करून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमास ग्रामस्थ, महिला व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दि. 31 जानेवारी रोजी झालेल्या समारोप समारंभात मान्यवरांनी शिबिरातील उपक्रमांचे विशेष कौतुक करून राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी स्वयंसेवकांनी आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त केले.
या सात दिवसीय विशेष हिवाळी शिबिरामुळे स्वयंसेवकांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, पर्यावरण संवर्धनाची भावना तसेच समाजसेवेची बांधिलकी अधिक दृढ झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या समारोपाने शिबिराची यशस्वी सांगता झाली. सदर शिबिराच्या आयोजनासाठी डॉ किशोर पवार  संचालक आदिवासी अकादमी  नंदुरबार, डॉक्टर दिनेश देवरे विभागीय समन्वयक व डॉक्टर विशाल करपे जिल्हा समन्वयक रासेयो यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
कार्यक्रम अधिकारी प्रा हर्षल चौरे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. स्मिता देशमुख, तसेच प्राध्यापक राजेश पावरा डॉ अर्चना पाटील प्रा रवींद्र पवार प्रा करमसिंग पावरा प्रा विपुल वसावे प्रतिभा गांगुर्डे तसेच आदिवासी अकादमीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी, 28 फेब्रुवारीपर्यंत ई- केवायसी पूर्ण करावी-प्रदीप पवार*
February, 04 2026
*आदिवासी अकादमी नंदुरबारचे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात संपन्न*
February, 04 2026
*कंजर भाट समाजातर्फे स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली*
February, 04 2026
*पोषण, प्रक्रिया व बाजारपेठेचा संगम, केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव*
February, 04 2026
*नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’-डॉ. संजीव वळवी*
February, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज