*नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’-डॉ. संजीव वळवी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’-डॉ. संजीव वळवी*
*नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’-डॉ. संजीव वळवी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नवापूर तालुक्यातील हत्तीरोग समस्येचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ‘सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’ (Mass Drug Administration - MDA) राबविण्यात येणार असून ही मोहीम 10 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपूर्ण तालुक्यात राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. या मोहिमेदरम्यान आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन पात्र लाभार्थ्यांना डी.ई.सी. (DEC) आणि अल्बेन्डाझॉल या गोळ्यांची एक मात्रा स्वतःच्या देखरेखीखाली खाऊ घालणार आहेत. हत्तीरोग हा ‘वुचेरेरीया बॅनक्रॉफटी’ या जंतूंमुळे होतो आणि त्याचा प्रसार ‘क्युलेक्स’ डासांमार्फत होतो. एकाच वेळी सर्वांनी औषध घेतल्यामुळे शरीरातील जंतू नष्ट होऊन प्रसार रोखण्यास मदत होते. मोहिमेतून केवळ खालील व्यक्तींना वगळण्यात आले आहे, गरोदर माता.
2 वर्षांखालील बालके. अतिगंभीर रुग्ण (ICU मध्ये उपचार घेत असलेले). रक्तदाब, मधुमेह किंवा इतर सामान्य आजार असलेल्या रुग्णांनी देखील या गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक आहे.
उपाशीपोटी औषध घेऊ नका: नागरिकांनी या गोळ्या उपाशीपोटी घेऊ नयेत. समक्ष सेवन: प्रत्येक व्यक्तीने आरोग्य कर्मचाऱ्यासमोरच गोळ्या खाणे बंधनकारक आहे.
सौम्य लक्षणे: औषध सेवनानंतर ताप किंवा मळमळ यांसारखा त्रास जाणवल्यास घाबरून जाऊ नये. शरीरातील हत्तीरोगाचे जंतू मरत असल्यामुळे असा त्रास होऊ शकतो. आवश्यक असल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत.
आरोग्य विभागातर्फे या मोहिमेसाठी शाळांमध्ये जनजागृती, शहरात होर्डिंग्ज, बॅनर्स आणि घंटागाडीद्वारे प्रचार करण्यात येत आहे. या मोहिमेत नवापूर तालुक्यातील प्रत्येक पात्र नागरिकाने सहभागी होऊन हत्तीरोग दुरीकरणासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वळवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



