*देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आनंद बाजार मेळाव्याद्वारे घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आनंद बाजार मेळाव्याद्वारे घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे*
*देवरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आनंद बाजार मेळाव्याद्वारे घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळाच्या आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे खाद्यपदार्थांचा आनंद मेळाव्यात डिजिटल व्यवहाराला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून खाद्यपदार्थांचा आनंद माता पालकांनी घेतला. आनंद मेळाव्याचे उद्घाटन विखरण येथील उपसरपंच सुनिता चंदु पवार, सरपंच प्रतिनिधी केशव पाटील, चंदू पवार, बाबुराव पाटील मनोहर लोहार, डिगंबर पाटील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका कामिनी देवरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके, यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष वैशिष्ट्ये म्हणजे सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यात आले. रोख रकमे सोबत युपीआय, क्यु. आर.कोड आणि मोबाईल पेमेंटचा वापर पालकांद्वारे करून खरेदी-विक्री करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते. घरगुती पदार्थ, पौष्टिक खाऊ, बाल आनंद मेळाव्यात भाजीपाला, भेळ, मटकी व हरभरा उसळ, पोहे, ढोकळे, पाणीपुरी, पोंगे, भजी, साबुदाणा वडा, लिंबू सरबत, समोसे, वडे,
पाणी, केळी, कुरकुरे, मसाला पान, इ.चवदार खाद्यपदार्थ बाल आनंद मेळाव्यात मांडण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. मनसोक्तपणे विद्यार्थ्यांनी,
पालकांनी, शिक्षकांनी बाल आनंद मेळाव्याचा आनंद लुटला. बाल आनंद मेळावा घेण्यासाठी खानदेशातील पारंपरिक पदार्थ तसेच आधुनिक स्नॅक्स यांना उपस्थित पालकवर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळाला. प्रत्येक स्टॉलवर डिजिटल पेमेंटसाठी क्यु. आर. कोड लावण्यात आले होते. त्यामुळे व्यवहार सोपे, जलद आणि पारदर्शक झाले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना उद्योजकता, नियोजन, व्यवहार कुशलता आणि डिजिटल साक्षरता यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाले. विद्यालयातील शिक्षकांनी मार्गदर्शन केले तर पालकांनीही मेळाव्यास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यालय प्रशासनाने सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याची सवय लागते. मेळाव्याचे डी.बी. भारती यांनी सुत्रसंचलन तर एस. एच. गायकवाड यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सी. व्ही.नांद्रे, एम.डी. नेरकर, वाय.डी. बागुल, एम.एस. मराठे, व्ही.बी. अहिरे, एस.जी. पाटील, एच.एम. खैरनार आदींनी संयोजन व सहकार्य केले. मेळावा यशस्वितेसाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे सहकार्य लाभले.



