*लहान घरांना घरपट्टी माफ, नंदुरबार पालिकेच्या स्थायी समितीची शिफारस, अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावर भाजपाने नोंदवली हरकत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लहान घरांना घरपट्टी माफ, नंदुरबार पालिकेच्या स्थायी समितीची शिफारस, अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावर भाजपाने नोंदवली हरकत*
*लहान घरांना घरपट्टी माफ, नंदुरबार पालिकेच्या स्थायी समितीची शिफारस, अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावर भाजपाने नोंदवली हरकत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार नगरपरिषद हद्दीतील 225 स्क्वेअर फुट पर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ करण्याची शिफारस आज नंदुरबार नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. त्याचबरोबर पाणीपट्टी एक हजार रुपयांवरून बाराशे रुपयांपर्यंत वाढवण्याच्या शिफारसीला देखील बैठकीत मान्यता देण्यात आली.
निवडणुकीनंतर आज दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी पहिल्यांदाच नंदुरबार नगर परिषदेच्या स्थायी समितीची पहिली बैठक नगराध्यक्षा सौ रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी घरपट्टी व पाणीपट्टी दर अकारणी बद्दलच्या विषयांना मान्यता देण्यात आली. येत्या सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चे अंती निर्णय केले जातील. बैठकीला स्थायी समितीचे सर्व सदस्य तथा सभापती उपस्थित होते. दरम्यान, विरोधी पक्षाच्या सदस्यांना विश्वासात न घेता आणि पुरेशी माहिती न देता स्थायी समितीपुढे विषय मांडण्यात आल्याबद्दल भाजपाचे नगरसेवक तथा विरोधी गटनेते हिरालाल चौधरी यांनी लेखी हरकत नोंदवली. 2025- 26 आणि 2026 -27 च्या अर्थसंकल्पा संदर्भात स्थायी समितीतील सदस्यांनी सूचना मांडाव्या आणि चर्चा करावी, हा प्रमुख विषय स्थायी समिती समोर मांडण्यात आला होता. परंतु सदस्यांना अर्थसंकल्पासंदर्भातील कोणत्याही टिपण्या देण्यात आल्या नाही. त्यामुळे कोणत्याही सदस्याला सूचना मांडता आल्या नाहीत. यावर हिरालाल चौधरी यांनी हरकत घेतली. किमान तीन दिवस आधी टिपणी दिली असती तर अभ्यास करून सदस्यांना म्हणणे मांडता आले असते परंतु तसे न करता विषय संमत करणे म्हणजे सदस्यांना परस्पर रोखण्यासाठी आहे; असे हिरालाल चौधरी म्हणाले. मुख्याधिकारी शिवांशू सिंह यांच्याकडे ही लेखी हरकत दिली असून पुढे जिल्हाधिकारी यांच्या समोर देखील हरकत मांडण्यात येईल, असेही चौधरी यांनी सांगितले.



