*नंदुरबार नगर पालिकेच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी एकूण रुपये 194 कोटी 86 लाख, 86 हजार, 686 इतक्या रकमेचे अंदाजपत्रक प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत सादर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार नगर पालिकेच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी एकूण रुपये 194 कोटी 86 लाख, 86 हजार, 686 इतक्या रकमेचे अंदाजपत्रक प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत सादर*
*नंदुरबार नगर पालिकेच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी एकूण रुपये 194 कोटी 86 लाख, 86 हजार, 686 इतक्या रकमेचे अंदाजपत्रक प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत सादर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार नगर परिषदेच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी एकूण रुपये 194 कोटी 86 लाख, 86 हजार, 686 इतक्या रकमेचा अंदाजपत्रक प्रस्ताव आज या सभागृहासमोर सादर करण्यात येत आहे. हे अंदाजपत्रक केवळ आकड्यांचे गणित नसून, नंदुरबार शहराच्या भविष्यासाठी आखलेली विकासाची स्पष्ट दिशा आहे. शहरातील नागरी सुविधा, पायाभूत सोयी-सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून हे अंदाजपत्रक वास्तववादी व संतुलित पद्धतीने तयार करण्यात आले आहे. मागील वर्षातील रुपये 45 कोटी 3 लाखांपेक्षा अधिकची प्रारंभीची शिल्लक गृहीत धरून, कर महसूल, शासन अनुदाने, नगरपरिषद मालमत्तांमधून होणारे उत्पन्न, विविध योजना व विशिष्ट प्रयोजनासाठी प्राप्त होणारी अनुदाने यांचा योग्य व नियोजनबद्ध वापर करण्यात येणार आहे. महसुली खर्चाच्या माध्यमातून कर्मचारीवर्गाची कार्यक्षमता, शहरातील मालमत्तांचे जतन व दुरुस्ती, नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, तसेच स्थिर व जंगम मालमत्ता विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. यामध्ये रुपये 188 कोटी 17 लाख निधी शहराच्या विकासासाठी तरतूद करण्यात आलेली आहे, ही बाब नगरपरिषदेच्या विकासाभिमुख धोरणाचे ठळक उदाहरण आहे. शहर विकासाचे उददीष्ट साध्य करतांना खर्चाबरोबर उत्पन्न वाढीचाही ताळमेळ करावा लागतो. नगर परिषदेने उत्पनाचे स्त्रोत वाढवावेत असे शासनाचे निर्देश आहेत. नगरपरिषदेने सन 2010 मध्ये पाणीपट्टी रुपये 1006 निश्चित केली होती. मागील 15 वर्षांपासून पाणीपट्टीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीत वीज दर, देखभाल- दुरुस्ती, मनुष्यबळ खर्च इत्यादी कारणांमुळे पाणीपुरवठा विभागाच्या उत्पन्न व खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झालेली आहे. ही तफावत काही अंशी भरून काढण्यासाठी आणि पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम व टिकाऊ ठेवण्यासाठी पाणीपट्टी रुपये 1250 करण्याची शिफारस स्थायी समितीमार्फत सर्वसाधारण सभेकडे करण्यात येत आहे. ही वाढ अत्यल्प असून यामुळे नागरिकांवर फारसा आर्थिक भार पडणार नाही, मात्र विभागाच्या खर्चाला काही प्रमाणात आधार मिळेल, असे मला वाटते. काही नगरसेवकांनी समक्ष केलेल्या चर्चेनुसार मागणी केली आहे की, शहरातील गरिब व सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सन 2026- 27 च्या अंदाजपत्रकाची शिफारस करतांना नगरपरिषद हद्दीतील झोपडपटटी मधील 225 चौरस फूट (Sq. Ft.) पर्यंतच्या घरधारक गरीब नागरीकांना घरपट्टी माफ करण्यात यावी. व असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे अंतिम निर्णयासाठी सादर करण्यात यावा. हा निर्णय सामाजिक बांधिलकीतून आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून घेण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामांची तरतूद करूनसुद्धा आर्थिक अ वर्षाच्या अखेरीस सुमारे रुपये 6 कोटी 69 लाख 86 हजार 686 शिल्लक राखण्यात येणार आहे. यामुळे नगरपरिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम, शिस्तबद्ध व स्वावलंबी असल्याचे स्पष्ट होते. हे अंदाजपत्रक नागरिककेंद्रित, विकासाभिमुख आणि 'आर्थिक शिस्त राखणारे असून नंदुरबार शहराला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणारे आहे. तरी सदर सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा अंदाजपत्रक प्रस्ताव या सभागृहाने एकमताने मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.



