*श्री रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्री रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ*
*श्री रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ*
नरसी(प्रतीनिधी):-येथून जवळच आसलेल्या रातोळी (ता.नायगांव) येथील ग्रामदैवत श्री रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सवाला आज एक फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असून गावकरी मंडळींनी जोरदार तयारी केली असल्याचे दिसून येत आहे.
यात्रेची सुरुवात एक फेब्रुवारी रविवारी पहाटे अभिषेक व पूजा सकाळी नऊ वाजता पालखी मिरवणूक रात्री बारा वाजता नयनरम्य अतीशबाजी,2 फेब्रुवारी रोजी महाप्रसाद व दुपारी दोन वाजता भव्य कुस्त्यांची दंगल होणार असून अखेरच्या मानाच्या कुस्तीसाठी 11,111 रुपयाची लावण्यात येणार असल्याचे यात्रा कमिटीने जाहीर केले आहे, 3 फेब्रुवारी रोजी मंगळवारी लोककला व लावणी महोत्सवाचे आयोजन केले आहे तरी तालुका परिसरातील जनतेने या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवराज पाटील, विश्वंभर पाटील, नंदू पाटील, विजय पाटील, राहुल पाटील, शिवाजी पाटील, गजानन पाटील, बालाजी पाटील, संदीप पाटील, विलास मावलगे बी.जी. रातोळीकर यांसह गावकरी मंडळींनी केले.



