*राज्यस्तरीय करियर कट्टा स्पर्धेत जी टी पी महाविद्यालयाचे घवघवीत यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यस्तरीय करियर कट्टा स्पर्धेत जी टी पी महाविद्यालयाचे घवघवीत यश*
*राज्यस्तरीय करियर कट्टा स्पर्धेत जी टी पी महाविद्यालयाचे घवघवीत यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेत नंदुरबार तालुका विधायक समितीच्या जी. टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने घवघवीत यश संपादित केले आहे. जी. टी. पी. महाविद्यालयाने विभागस्तरीय स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा नंदुरबार जिल्हा प्राचार्य प्रवर्तक व कबचौउमवि, जळगावचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी यांना उत्कृष्ट जिल्हास्तरीय प्राचार्य म्हणून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आलेले आहे. प्रा. भुषण भटू चौधरी यांनी उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक म्हणून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. डॉ. डी. एस. पाटील यांनी जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहिले व महाविद्यालयाचे सादरीकरण हे राज्यस्तरीय समितीसमोर सादर केले. तसेच महाविद्यालयात स्थापन झालेल्या करियर संसदेस उत्कृष्ट करियर संसद म्हणून प्रथम पारितोषिक मिळाले आहे. महाविद्यालयाने तब्बल चार पुरस्कार पटकावले असून महाविद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. मागील वर्षी देखील असेच पुरस्कार प्राप्त केले असून आपल्या यशाची परंपरा महाविद्यालयाने कायम ठेवलेली आहे ही अभिनंदनची बाब आहे. ह्या यश संपादनाबद्दल संस्थाचालक, समन्वयक, प्राध्यापक, सर्व कर्मचारीवृंद आदि सर्वांनी महाविद्यालयाचे कौतुक केले आहे.



