*नंदुरबार जिल्ह्यात 16 वा ‘राष्ट्रीय मतदार दिन’ उत्साहात साजरा-कल्पना ठुबे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यात 16 वा ‘राष्ट्रीय मतदार दिन’ उत्साहात साजरा-कल्पना ठुबे*
*नंदुरबार जिल्ह्यात 16 वा ‘राष्ट्रीय मतदार दिन’ उत्साहात साजरा-कल्पना ठुबे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-25 जानेवारी 2026 रोजी 16 वा राष्ट्रीय मतदार दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला या दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवून मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली. जिल्हास्तरीय कार्यक्रम हा मिशन हायस्कूल, नंदुरबार येथे परिसंवाद, विविध चर्चासत्रे आणि स्पर्धांसह जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा संदेश यावेळी प्रसारित करण्यात आला तसेच मतदाराची शपथ घेण्यात आली आणि विद्यार्थिनींना जागृत मतदार, मतदाराचे कर्तव्ये व जबाबदाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विधानसभा मतदारसंघातील तालुक्यातील सर्व कार्यालयांत व मतदान केंद्रनिहाय संपूर्ण जिल्ह्यात हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांस अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे (प्रशासन), शाम वाडकर (ससप्र), उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, एस.ए. मिशन हायस्कुलच्या प्राचार्य श्रीमती नुतन वळवी, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती नलिनी अहिरराव यांनी केले.



