*स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदरावर कर्ज योजना-हितेश पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदरावर कर्ज योजना-हितेश पाटील*
*स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदरावर कर्ज योजना-हितेश पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांच्या शाखा कार्यालयामार्फत राज्य शासनाच्या सहाय्याने अल्प व्याजदरावर विविध व्यवसायांसाठी कर्ज पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे शाखा व्यवस्थापक हितेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शाखा कार्यालय, नंदुरबार येथे खालील योजनांसाठी लक्षांक प्राप्त झाला आहे, महिला सबलीकरण योजना रुपये 2 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (26 लक्षांक). कृषी संलग्न व्यवसाय: रुपये 5 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (10 लक्षांक). हॉटेल/धाबा रुपये 5 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (8 लक्षांक) ऑटो वर्कशॉप/स्पेअरपार्ट रुपये 5 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (8 लक्षांक) वाहन व्यवसाय रुपये 10 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (4 लक्षांक)
लघु उद्योग रुपये 3 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (8 लक्षांक)
ऑटोरिक्षा/मालवाहू रिक्षा रुपये 3 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (4 लक्षांक). बचत गट रुपये 5 लाख पर्यंत कर्ज मर्यादा (9 लक्षांक) इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महामंडळाच्या loan.mahashabari.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची फाईल शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, शाखा कार्यालय, जुने प्रकल्प कार्यालय, धुळे चौफुली जवळ, नंदुरबार येथे जमा करावी, असेही शाखा व्यवस्थापक हितेश पाटील यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



