*रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
*रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट*
मुंबई(प्रतिनिधी):-येथील रिलायन्स समूहाच्या रुग्णालयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनाच्या व्यस्त व नियोजित कार्यक्रमातून वेळेत वेळ काढून राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुमारे 30 मिनिटं रुग्णालयात होते. डॉ विजयकुमार
गावित यांची भेट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.विजयकुमार गावित यांच्या सुकन्या मा. खासदार डॉ. हिना गावित व माजी जि. प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांची भेट घेऊन आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीबाबत तपशील जाणून घेतला. तसेच रुग्णालयाच्या प्रमुखांशी ही त्यांनी संपर्क साधून गावित यांच्या प्रकृती बाबत आवश्यक ते काळजी घेत निर्देश दिले. यापूर्वी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. विजयकुमार गावित यांना तातडीने नाशिक येथून मुंबईला हलविण्याच्या प्रक्रियेत रिलायन्स रुग्णालयाच्या मुख्य संचालकांशी तथा नाशिक व मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून विमानतळाहून रुग्णालयापर्यंत वाहतूक व्यवस्थेत कुठलाही अडथळा येणार नाही व सरळ रुग्णालयात विजयकुमार गावित यांच्या रुग्णवाहिकेला प्रवेश दिला जाईल अशा पद्धतीने वाहतूक व्यवस्था बदल करण्याबाबत निर्देश दिले होते तसेच डॉ.हिना गावित यांच्याशी त्यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृती विषयी विचारपूस केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावित यांच्या प्रति सद्भावना, सदिच्छा व्यक्त केल्याबद्दल
डॉ.सौ.कुमुदिनी विजयकुमारजी गावित यांनी गावित परीवारातर्फे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार व्यक्त केले.



