*आयएमए नंदुरबारतर्फे “आयएमए फॅमिली बॉक्स क्रिकेट 2026” यशस्वीरीत्या संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आयएमए नंदुरबारतर्फे “आयएमए फॅमिली बॉक्स क्रिकेट 2026” यशस्वीरीत्या संपन्न*
*आयएमए नंदुरबारतर्फे “आयएमए फॅमिली बॉक्स क्रिकेट 2026” यशस्वीरीत्या संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नंदुरबार शाखेच्या वतीने “आयएमए फॅमिली बॉक्स क्रिकेट 2026” स्पर्धेचे यशस्वी आयोजन के. आर. पब्लिक स्कूल येथे करण्यात आले. हा उपक्रम आयएमए अध्यक्ष डॉ. राजेश वसावे, सचिव डॉ. स्वगत शहा व खजिनदार डॉ. गणेश पाकळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या स्पर्धेला आयएमए सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, आयएमए नंदुरबारच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग या कार्यक्रमात नोंदविण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात खेळभावना, उत्साह व आपुलकीचे वातावरण अनुभवायला मिळाले. यावर्षी प्रथमच महिला बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तीन महिला संघांनी उत्साहात सहभाग घेतला असून, महिला सामने संपूर्ण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. पुरुष विजेते: NIMS सुपरकिंग्स – कर्णधार डॉ. विलास परडके
महिला विजेते डॉ. वृशाली पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघ
यावर्षी पुरुष व महिला अशा दोन विजेत्या संघांसह स्पर्धेचा गौरवशाली समारोप झाला. या यशस्वी आयोजनासाठी स्पोर्ट्स अँड फिटनेस कमिटीचे सदस्य डॉ. विजय पटेल, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. भरत चौधरी व डॉ. दिनेश वळवी, महिला सामन्यांचे उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या डॉ. नम्रता पाटील, महिला कर्णधार डॉ. संगीता पाटील व डॉ. वृशाली पाटील, सर्व संघकर्णधार, स्कोअरर्स तसेच पंच प्रणव कोठावडे व विपुल शहा यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
तसेच के. आर. पब्लिक स्कूलचे सिद्धार्थ वाणी यांनी मैदान उपलब्ध करून देणे, पिच तयार करणे व भोजन व्यवस्थेसाठी दिलेले मोलाचे सहकार्य विशेष उल्लेखनीय ठरले.
आयएमए फॅमिली बॉक्स क्रिकेट 2026 हा उपक्रम केवळ क्रीडा स्पर्धा न राहता, आयएमए कुटुंबातील एकोपा, सहभाग आणि समावेशकतेचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.



