*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि युवकांची राष्ट्रनिर्मितीतील भूमिका यावर मार्गदर्शन केले. तसेच नुकत्याच पार पडलेल्या IDESSA स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना तसेच क्रीडा क्षेत्रातील यशाबद्दल अभिमानाची जाणीव निर्माण झाली.



