*जी.टी. पाटील महाविद्यालयात रोजगार कौशल्य विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची यशस्वी सांगता*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी. पाटील महाविद्यालयात रोजगार कौशल्य विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची यशस्वी सांगता*
*जी.टी. पाटील महाविद्यालयात रोजगार कौशल्य विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची यशस्वी सांगता*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विभागामार्फत तीन महिन्यांचा एम्प्लॉयबिलिटी स्किल्स अँड पब्लिक स्पिकिंग या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पार पडला. दैनंदिन अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षमता वाढविणे तसेच सार्वजनिक व्यासपीठावर आत्मविश्वासाने बोलण्याचे कौशल्य विकसित करणे, या उद्देशाने सदर अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तीन महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत चित्रफिती व पॉवर पॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, टाईम मॅनेजमेंट, अॅटिट्यूड डेव्हलपमेंट तसेच इंटरपर्सनल रिलेशनशिप यांसारख्या रोजगारासाठी उपयुक्त विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
अभ्यासक्रमाची सांगता महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या हस्ते व माजी प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करून करण्यात आली. यावेळी डॉ. विश्वास पाटील यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक जीवनातील कौशल्यांचा अंगीकार करून स्वतःची प्रगती साधावी असा सल्ला दिला. तर प्राचार्य डॉ. रघुवंशी यांनी अभ्यासक्रमा दरम्यान आत्मसात केलेल्या रोजगार कौशल्यांचा दैनंदिन जीवनात प्रभावी वापर करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमास इंग्रजी विभागप्रमुख डॉ. डी. डी. गिरासे, डॉ. ए. डी. आखाडे व डॉ. डी. बी. देवरे उपस्थित होते. सदर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. विजय चौधरी यांनी अभ्यासक्रमादरम्यान मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी प्रा. सचिन आढावे व प्रा. राहुल मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.



