*उमेश पाडवी यांना विशेष राज्य पुरस्काराने सन्मानित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उमेश पाडवी यांना विशेष राज्य पुरस्काराने सन्मानित*
*उमेश पाडवी यांना विशेष राज्य पुरस्काराने सन्मानित*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा दसवड शाळेचे मुख्यध्यापक उमेश मगन पाडवी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. रविवारी दि 18 जानेवारी 2026 रोजी नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉन्फरन्स हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. राजकुमार अवसरे होते. ज्ञानेश्वर रक्षक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश देवतळे आदींची उपस्थिती होती. नागपूर येथील सामाजिक बांधिलकी फाउंडेशनच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात आले.



