*सुमन एज्युकेशन सोसायटी संचालित कै. सुमन बारकू वाघ कला आणि विज्ञान महाविद्यालय खांडबारा येथे स्नेहसंमेलन संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सुमन एज्युकेशन सोसायटी संचालित कै. सुमन बारकू वाघ कला आणि विज्ञान महाविद्यालय खांडबारा येथे स्नेहसंमेलन संपन्न*
*सुमन एज्युकेशन सोसायटी संचालित कै. सुमन बारकू वाघ कला आणि विज्ञान महाविद्यालय खांडबारा येथे स्नेहसंमेलन संपन्न*
खांडबारा(प्रतिनिधी):- नवापूर तालुक्यातील खांडबारा येथ वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या तसेच स्व. मा. सुमन वाघ, स्व. मा.बारकू वाघ, स्व. मा. मनीष रावसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शत्रुघ्न पाटोळे प्रमुख पाहुणे अभिजीत रामराजे, ॲग्री हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मीना वळवी, प्रभारी सरपंच योगेश चौधरी, ॲग्री हायस्कूलचे उप मुख्याध्यापक एन. ए. अहिरे, महाविद्यालयाचे समन्वयक डि.के. बोरसे, सुनील भामरे, शरीफ बागवान, मनोज चौधरी आदी मान्यवरांचे शाल, गुलाब पुष्प देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत स्वागत गीत 'मन की वीना से' गीत गायन करण्यात आले तसेच 'हीच
आमची प्रार्थना' हे गीत गायन करण्यात आले. विद्यार्थिनींनी मराठी गीत 'चक चक सोन्याचा' व दक्षिणात्य गीत' गीरा गीरा' या गाण्यावर नृत्य सादर केले तसेच 'वाटणी' ही नाटिका सादर करण्यात आली प्रा. बोधीपाल लोंढे सरांनी गीत गायन केले कार्यक्रमाच्या शेवटी फिश पॉइंटचे वाचन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी अध्यक्षीय भाषण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापिका संविधा गांगुर्डे यांनी केले आभार प्रदर्शन प्राध्यापक मनोज पाडवी यांनी केले. कार्यक्रमात अश्विनी ईशी, मेघा साळवे, कीर्ती कुंभार, विजया मोरे, योगिनी वळवी, राधा वळवी, सावित्री, नाझिया, निखिल, गौतम, आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यावेळी प्रा.समिधा गांगुर्डे प्रा. बोधीपाल लोंढे, प्रा.कल्पना वळवी प्रा. प्रीती गोसावी प्रा. तेजस्विनी प्रा. मनोज पाडवी, प्रा. उदित पाडवी, प्रा. सोनाली गावित, प्रा. संजय देवरे, प्रा. कृपाली गावित आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.



