*बामखेडा महाविद्यालयात आत्मनिर्भय युवती कार्यशाळेची सांगता*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा महाविद्यालयात आत्मनिर्भय युवती कार्यशाळेची सांगता*
*बामखेडा महाविद्यालयात आत्मनिर्भय युवती कार्यशाळेची सांगता*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय बामखेडे त.त. आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, जळगाव विद्यार्थी विकास विभागतील युती सभेच्या वतीने आत्मनिर्भर युवती अभियान ही तीन दिवसीय 50 विद्यार्थ्यांनीची कार्यशाळा घेण्यात आली. या उद्घाटन पर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. यावेळी पहिले पुष्प गुंफतांना ॲड. संगीता पाटील यांनी महिला आणि कायदे या विषयावर मार्गदर्शन केले दुपारी क्षेत्रीय भेट साठी विद्यार्थींना सारंखेडा पोलीस स्टेशनला भेट दिली. तेथील पीआय रविंद्र बागुलसर यांनी पोलीस स्टेशन मधील कामकाज आणि सायबर क्राईम यासंबंधी माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी सौ. मंगला पाटील यांनी महिला आणि योग या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी योगाचे प्रकार आणि महत्त्व स्पष्ट केले. दुपारच्या सत्रांमध्ये सुरेश अहिरे यांनी सायबर क्राईममध्ये घडणारे गुन्हे त्याच्यापासून आपण स्वतःला कशा प्रकारे सुरक्षित ठेऊ शकतो याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे शाखा प्रबंधक रघुवंशी यांनी बँकिंग व्यवहार कसा चालतो आणि त्यांच्यावर ऑनलाईन फसवणूक कशी होते या गोष्टींची माहिती दिली. तर दुपारच्या सत्रात सौ. मनीषा बोरसे यांनी ब्युटी पार्लर व्यवसाय काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींना ब्युटी पार्लर चे महत्व आणि आज त्याचा करिअर कासे घडू शकते याबद्दल माहिती दिली. तर समारोप प्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे समन्वयक डॉ. विजय शर्मा प्रमुख अतिथी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच. एम.पाटील होते. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैशाली पारधी, पूजा चौधरी आणि नेहा चित्ते यांनी तीन दिवसाच्या काळात आलेले अनुभव व्यक्त केले. या प्रसंगी डाॅ विजय शर्मा यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची शिस्त व बोलण्याचे धाडस व त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद याचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. सी. एस. करंके यांनी केले तर प्रास्ताविक युती सभा समन्वयक डॉ. के. पी. पाटील यांनी केले आणि आभार प्रगटन डॉ.बी. एन. गिरासे यांनी केले.



