*तळेदा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तळेदा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
*तळेदा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश*
तळोदा(प्रतिनिधी):-तालुक्यातील राझंणी येथे दिनांक 18 जानेवारी रोजी मा.मंत्री पदमाकर वळवी यांचे विश्वासु समजले जाणारे जालमसिंग गावित, अनिल चव्हाण यांच्यासह राझंणी ग्रामपंचायतेचे मा.सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे* आणि तळोद्याचे राष्ट्रवादीचे नेते योगेश चौधरी यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची निवडणुका लढण्याची मानसिकता संपलेली असुन नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला काँग्रेसच्या नेतृत्वाने वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात शिव, शाहु, फुले, आंबेडकर विचारधारेवर प्रेम करणाऱ्या जणसामान्यांना आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपलीशी वाटत आहे आणि त्यामुळेच आजचा हा पक्ष प्रवेशसोहळा घडुन येत आहे. याप्रसंगी भाजपचे ग्रामपंचायत सदस्य धनराज मराठे,
अनिल चव्हाण,
जालमसिंग गावीत, गणेश बोराणे, ज्ञानेश्वर मराठे, मुरलीधर कापसे तानका पाडवी, भबुता मुलवी,
सुकलाल पाडवी, रमण पाडवी, परशराम ठाकरे, रामसिंग पाडवी, विजयसिंग पाडवी, जालमसिंग पाडवी, नागेश पाडवी, किरण पाडवी उपस्थित होते.



