*एकलव्य विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी*
*एकलव्य विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त एकलव्य विद्यालयात अभिवादन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोघांच्याही प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुयोग शिंपी यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना मराठेशाही एकत्र आणण्यासाठी जिजाऊंनी केलेला प्रयत्न व शिवरायांना घडवताना त्यांनी केलेले संस्कारांचे बीजारोपण यांचे वेगवेगळे दाखले दिले. शिवरायांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या एक मुत्सद्दी व्यक्तिमत्त्व म्हणून जिजाऊंचा लौकिक मोठा होता याचेही अनेक उदाहरणे शिंपी यांनी दिले.
तसेच दुसरे प्रमुख वक्ते राहुल भावसार यांनी देशाच्या जडणघडणीत ज्या तरुणांचे योगदान आहे त्या सर्वांचे प्रेरणादायी ठरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे विवेकानंद होय. ज्ञान, चारित्र्य, एकाग्रता व योग यांच्या स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेल्या व्याख्या आणि संकल्पना त्यांनी विस्ताराने सांगितल्या. विवेकानंदांच्या बालपणातील अनेक प्रेरक प्रसंग भावसार यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी व्यासपीठावर विद्यालय तथा ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, धर्मेंद्र मराठे, दीपक माळी, अजित लांडगे, मोनाली त्रिकाळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख गौरीशंकर धुमाळ आदी उपस्थित होते. मेधा गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



