*ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न*
*ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. प्रथम स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रकाश चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी राजमाता जिजाऊंनी आपल्या संस्कारांच्या देणगीतून स्वराज्याला दोन छत्रपती दिले आणि महाराष्ट्र गुलामगिरीच्या तावडीतून कशाप्रकारे मुक्त केला हे पटवून दिले तसेच स्वामी विवेकानंदांबद्दल माहिती देताना आपल्या अवघ्या 39 वर्षांच्या आयुष्यात हिंदू धर्माची पताका जगभरात फडकविण्याचे महान कार्य केले तसेच आजच्या युवा पिढीसाठी स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण जीवनकार्य कशाप्रकारे एक प्रेरणास्थान आहे, हे विविध उदाहरणांतून विशद करून सांगितले. विवेकानंदांच्या ठायी असलेली कुशाग्र बुद्धिमत्ता, जिद्द, चिकाटी आणि मेहनत या गुणांचा आपणही अंगीकार करावा आणि आपल्या राष्ट्राचे नाव उज्वल करावे असा मोलाचा सल्ला उपस्थितांना यावेळी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील चौधरी यांनी भूषविले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे इतर सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. वर्षा घासकडबी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी स्वामी विवेकानंद यांनी युवकांसाठी सांगितलेला कर्मसिद्धांत सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुप गोस्वामी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीमती सुवर्णा गिरासे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक वृंद यांनी सहकार्य केले.



