*जी.टी.पाटील महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी.पाटील महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी*
*जी.टी.पाटील महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्राचार्यांनी युवा दिनाच्या शुभेच्छा देतांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुणांसाठी दिशादर्शक असून त्यातून राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक अशी ऊर्जा व प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, उपप्राचार्य डॉ. संदीप पाटील, सैनिक रणवीर सिंग तसेच डॉ. व्ही. झेड. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. समिती प्रमुख डॉ. उपेंद्र धगधगे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारक्षम नेतृत्वाबद्दल व स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रजागृतीच्या विचारांवर सविस्तर प्रकाश टाकत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. मनोज शेवाळे, डॉ. दिनेश देवरे, प्रा. संदीप बडगुजर, प्रा. पी. सी. भिल व प्रा. हर्षबोध बैसाणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



