*ईलाही चौकातील सभेत आ.चंद्रकांत रघुवंशींच्या विरोधकांना सल्ला, रंगांचे राजकारण न करता प्रेमाचं राजकारण करा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ईलाही चौकातील सभेत आ.चंद्रकांत रघुवंशींच्या विरोधकांना सल्ला, रंगांचे राजकारण न करता प्रेमाचं राजकारण करा*
*ईलाही चौकातील सभेत आ.चंद्रकांत रघुवंशींच्या विरोधकांना सल्ला, रंगांचे राजकारण न करता प्रेमाचं राजकारण करा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-निवडणुकीत विरोधकांनी समाजा समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जनतेशी आमच्या विश्वास आणि प्रेम जुळलेलं आहे ते कुणीही तोडू शकत नाही. मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेला मतदान केल्याचे सांगत रंगांचे राजकारण न करता प्रेमाचं राजकारण करण्याच्या सल्ला शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी विरोधकांना दिला. नंदुरबार शहरातील इलाही चौकात विजयी सभा घेण्यात आली याप्रसंगी ते आ. रघुवंशी बोलत होते. ते म्हणाले, पालिकेचे काम करतांना विरोधी पक्षात असलेल्या नगरसेवकांच्या देखील मानसन्मान करण्यात येईल परंतु, विकासाच्या आड राजकारण होत असेल तर आम्ही पण राजकारण करण्यास तयार आहोत. समन्वयातून विकासाची कामे सांगितल्यास ते सत्ताधारी या नात्याने करण्यास आम्ही तयार आहोत. नागरिक जे सांगतील ते काम आम्ही करू आ. चंद्रकांत रघुवंशी विकासाच्या मुद्द्यावर हात घालत म्हणाले, मुस्लिम वसाहतीत पालिकेचा माध्यमातून एखाद मोठ काहीतरी करण्याची इच्छा आहे. परंतु, जागे अभावी ते होऊ शकत नाही. लोकमान्य टिळक विद्यालय पटांगण दुरुस्त करून त्या ठिकाणी बगीचा बनवण्याच्या मानस आहे. नागरिक जे विकासाची कामे सांगणार ते निश्चितपणे करण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करू. यावेळी माजी आ. शिरीष चौधरी म्हणाले, जनतेनं विकासाला पाहून शिवसेनेला मते दिली आहेत. भाजपकडून येथील मतदारांना भडकवण्याच्या प्रयत्न केला. हिरालालकाकांवर मुस्लिम समुदायाने प्रेम दिलं. आता राजकारणात आमची तिसरी पिढी उतरली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी सांगितले, मतदानानंतर 20 दिवसात विरोधकांकडून वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात आल्या. याचा पराभव होईल तो विजय होईल. परंतु, प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर विरोधक मैदान सोडून पळून गेलेत. प्रभाग 1 ते 9 पर्यंत त्यांचे खातं देखील उघडलं नव्हतं.
यावेळी स्वीकृत नगरसेवक परवेज खान यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी नवनियुक्त नगरसेवकांच्या सत्कार करण्यात आला. उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक किरण रघुवंशी, कुणाल वसावे, योगेश राजपूत, विजय माळी, माजी नगरसेवक फारूक मेमन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रहीम शेख यांनी केले.



