*नरसी येथे 23 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंती महोत्सवाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नरसी येथे 23 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंती महोत्सवाचे आयोजन*
*नरसी येथे 23 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंती महोत्सवाचे आयोजन*
नरसी(प्रतीनिधी):-क्रांतिकारी महामानव जगद्गुरु गुरु रविदास महाराज यांची सार्वजनिक जयंती 23 फेब्रुवारी 2026 रोजी सोमवारी नरसी (ता.नायगांव) विवीध मान्यवर मंडळीच्या उपस्थीतीत उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती जयंती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांनी दिली. प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षी देखील गुरु रविदास जयंती महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने नरसी येथील गुरु रविदास मंदीर प्रेरणास्थळी नुक्तीच महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली असून दिनांक 23 फेब्रुवारी 2026 सोमवारी मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत विवीध सामाजिक उपकृम राबवून गुरु रविदास जयंती महोत्सव उत्साहपुर्ण वातावारणात साजरा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. या बैठकीला जेष्ठ सल्लागार गंगाराम गंगासागरे, सटवा बरबडे, जयंती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर गंगासागरे, सचिव माधव गंगासागरे, हाणमंत गंगासागरे, गंगाधर दुडकीकर, धोंडीबा कांबळे, सुरेश कांबळे, आनंदा बरबडे, बाबूराव गंगासागरे, शैलेश गंगासागरे, नामदेव करकले, रोहीदास गंगासागरे, गजानन गंगासागरे, पांडूरंग गंगासागरे, पिराजी बरबडे, अशोक गंगासागरे, सायबू दुडकीकर, शिवाजी गायकवाड आदींची उपस्थीती होती.



