*नवापाडा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवापाडा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न*
*नवापाडा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-नवापाडा केंद्राअंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे माध्यमिक शाळा नवापाडा येथे उत्साहात करण्यात आले. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड, संघभावना व शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित झाले. स्पर्धांचे उद्घाटन केंद्रप्रमुख अनिल पाटील, नवापाडा सरपंच शांताराम पाडवी, गव्हाळी गावाचे सरपंच संदीप वळवी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.
या स्पर्धांमध्ये 100 मीटर धावणे, कबड्डी व खो-खो (मुले व मुली) अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून आपली क्रीडा कौशल्ये सादर केली. कबड्डी व खो-खो या सांघिक खेळांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षकांनी पंच व आयोजक म्हणून मोलाचे सहकार्य केले. स्पर्धेतील विजेत्या संघांना व वैयक्तिक विजेत्यांना ट्रॉफी, पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व माननीय केंद्रप्रमुख अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे विशेष कौतुक करण्यात आले.
कबड्डी विजेता टिम
1 ते 4 लहान गट मुली जि.प.शाळा टावली, 1 ते 4 लहान गट मुले जि.प. शाळा पोरांबी
5 ते 7 मोठा गट मुली माध्य.नवापाडा
5 ते 7 मोठा गट मुले जि.प. शाळा खडकुना खो- खो विजेता टिम 1 ते 4 लहान गट मुली जि. प.शाळा टावली, 1 ते 4 लहान गट मुले जि.प. शाळा टावली
5 ते 7 मोठा गट मुली जि.प. शाळा खडकुना 5 ते 7 मोठा गट मुले जि.प. शाळा टावली
धावणे 100 मी विजेता 1 ते 4 लहान गट मुली जि.प. शाळा डोंगरीपाडा (डिंपल) 1 ते 4 लहान गट मुले जि. प. शाळा भंडारा (कमलेश) 5 ते 7 मोठा गट मुली जि. प. शाळा खडकुना (कॅजल) 5 ते 7 मोठा गट मुले जि.प. शाळा टावली (कौशिक) या क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व अविस्मरणीय ठरल्या. कार्यक्रमाच्या शेवटी नारसिंग पाडवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.



