ताजा खबरे:
*इमिनन्स पॉवर पब्लिक स्कूलचा क्रीडा दिन उत्साहात साजरा*
*नरसी येथे 23 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंती महोत्सवाचे आयोजन*
*मुर्शी वाणीवाडी येथील ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत संगमेश्वर, साखरपा येथील देवडे गावातील "देवडे बॉईज" संघ विजयी*
*नवापाडा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे विविध दिनांचे उत्साहात आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बामखेडा महाविद्यालयाच्या रासेयो विशेष हिवाळी शिबिराचा जयनगर येथे समारोप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बामखेडा महाविद्यालयाच्या रासेयो विशेष हिवाळी शिबिराचा जयनगर येथे समारोप*

  • Share:

*बामखेडा महाविद्यालयाच्या रासेयो विशेष हिवाळी शिबिराचा जयनगर येथे समारोप*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचा जयनगर येथे अत्यंत उत्साहात समारोप समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी ग्रामविकास संस्थेचे सचिव आप्पासाहेब बी. व्ही. चौधरी समारोप समारंभाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जयनगरचे सरपंच मोगराज सोनवणे, उपसरपंच तथा गटनेते वनश्री ईश्वर संतोष माळी, विद्यापीठाचे प्रतिनिधी विभागीय समन्वयक प्रा. दीपक वळवी, चक्रधर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य  ईश्वर देवमन माळी, विकास हायस्कूलचे माजी संचालक दगडू देविदास पाटील, जयनगर ग्रामपंचायत अधिकारी बी. ए. पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ सिंधुबाई बंडू सहारे, व सौ मंगलाबाई भगवान माळी, सामाजिक कार्यकर्ते अंकुश सोनवणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर शिबीर प्रा डॉ. सुंदर पाडवी यांनी सात दिवसीय शिबिराचा लेखाजोखा प्रास्ताविक रूपाने मांडला. त्यात त्यांनी शिबिर कालावधीत राबविलेले विविध उपक्रम, श्रमदान, रक्तदान, वनराई बंधाऱ्याचे बांधकाम, ग्रामस्वच्छता, परिसर स्वच्छता, जयनगर यात्रेतील स्वयंसेवकांनी बजावलेली भूमिका, शिबिर कालावधीत विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटी, विद्यार्थ्यांचा प्रत्येक उपक्रमातील उत्स्फूर्त सहभाग, इत्यादी मुद्द्यांवर प्रकाश टाकला. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्याच्यानंतर शिबिरात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात दिपाली पाटील, हरीश जगताप यांचा समावेश होता. उत्कृष्ट कलापथक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात अर्जुन भिल, उमेश कोळी यशवंत कोळी, परमेश्वर भिल, अजय पाटील, इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्याच्यानंतर रक्तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात सुरज शिरसाठ, आकाश मालचे, योगेश कोळी, चंद्रकांत सोलंके, मौला पटेल सादिक इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्याच्यानंतर शिबिर काळात उत्कृष्ट स्वयंपाक करणाऱ्या ग्रुपला बक्षीस देण्यात आले. त्यात दिव्या अँड पल्लवी ग्रुप चा समावेश होता. त्याच्यानंतर सात दिवसीय शिबिरात आलेले अनुभव विद्यार्थ्यांनी कथन केले. त्यात कैलास सोनवणे, दिपाली पाटील, दिव्या गिरासे इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्याच्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. रासेयो विभागीय समन्वयक प्रा. दीपक वळवी यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांच्या श्रमदानाचे कौतुक केले. एवढेच नव्हे तर विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध शिबिरांमध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. जयनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा गटनेते वनश्री ईश्वर संतोष माळी यांनी देखील आपल्या भाषणात विद्यार्थ्यांचे गुणगान केले. मी सुद्धा एकेकाळी एनएसएस चा विद्यार्थी होतो. मी स्वतः एनएसएस चे शिबिर केलेले आहे. आणि मी याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन केले. त्याच्यानंतर जयनगर ग्रामपंचायत सदस्या सौ मंगलाबाई भगवान माळी यांनी आपल्या भाषणात प्रत्येक विद्यार्थ्यांने आई-वडील व गुरुजनांचा मान सन्मान बहुमान राखावा. शिक्षण घेत असताना कुठेही आपल्याला गाल बोट लागू नये याची खबरदारी घ्यावी असे आवाहन केले. यानंतर समारोप समारंभाचे अध्यक्ष तथा ग्राम विकास संस्थेचे सचिव आप्पासाहेब बी. व्ही. चौधरी यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच शिबिरातील श्रमदान, विविध उपक्रम व विद्यार्थ्यांचे अनुभव कथन लक्षात घेता, सात दिवशीय शिबिर यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर उपस्थित पालकांना ग्रामविकास संस्थेच्या विविध शाखांना भेट देण्यासाठी बामखेडा येथे या असे आवाहन केले. याप्रसंगी ग्रामविकास संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालयाचा संपूर्ण स्टाफ व श्री चक्रधर माध्यमिक आणि कै मुक्ताबाई आंबेकर उच्च माध्यमिक विद्यालयाचा स्टाफ व ग्रामस्थ, स्वयंसेवक स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वाय. सी. गावित यांनी केले. रासेयो सात दिवशीय श्रमसंस्कार शिबिर यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रा डॉ. सुंदर पाडवी व महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.के. पी. पाटील तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ.वाय सी गावित यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*इमिनन्स पॉवर पब्लिक स्कूलचा क्रीडा दिन उत्साहात साजरा*
January, 11 2026
*नरसी येथे 23 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंती महोत्सवाचे आयोजन*
January, 10 2026
*मुर्शी वाणीवाडी येथील ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत संगमेश्वर, साखरपा येथील देवडे गावातील "देवडे बॉईज" संघ विजयी*
January, 10 2026
*नवापाडा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न*
January, 10 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे विविध दिनांचे उत्साहात आयोजन*
January, 10 2026

थोडक्यात बातमी

*इमिनन्स पॉवर पब्लिक स्कूलचा क्रीडा दिन उत्साहात साजरा*
January, 11 2026
*नरसी येथे 23 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंती महोत्सवाचे आयोजन*
January, 10 2026
*मुर्शी वाणीवाडी येथील ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत संगमेश्वर, साखरपा येथील देवडे गावातील "देवडे बॉईज" संघ विजयी*
January, 10 2026
*नवापाडा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न*
January, 10 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथे विविध दिनांचे उत्साहात आयोजन*
January, 10 2026

थोडक्यात बातमी

*इमिनन्स पॉवर पब्लिक स्कूलचा क्रीडा दिन उत्साहात साजरा*
January, 11 2026
*नरसी येथे 23 फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंती महोत्सवाचे आयोजन*
January, 10 2026

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज