*शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नामकरण सोहळा जल्लोषात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नामकरण सोहळा जल्लोषात संपन्न*
*शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नामकरण सोहळा जल्लोषात संपन्न*
लांजा(प्रतिनिधी):-वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व तु. पु. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय व यामाहा ट्रेनिंग स्कूल या शैक्षणिक संकुलाच्या कोनशिलेचे अनावरण व शालेय परिसराचा नामकरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. श्रीमती रोहिणी रमेश डोळस यांच्या शुभहस्ते मुख्य कोन शिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ञ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. गिरीश काशिनाथ कोळवणकर, रवींद्र द्वारकानाथ सामंत, विश्वास परशुराम चितळे, श्रीधर रघुनाथ ठाकूर, मारुती रामचंद्र डोळस यांची प्रमुख उपस्थिती लाभली
त्यावेळी शैलेश डोळस व त्यांच्या परिवाराचे ढोलताशा व पुष्पवृष्टी व औक्षण करून स्वागत करण्यात आले. शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नाम फलकाचे अनावरण रवींद्र सामंत यांनी केले. त्यानंतर श्रीमती रोहिणी रमेश डोळस सांस्कृतिक भवनाचे अनावरण विश्वास परशुराम चितळे यांनी केले. सभागृहाच्या कोण शिलेचे अनावरण श्रीधर ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री मारुती डोळस यांच्या हस्ते करण्यात आले. रमेश धोंडू डोळस सभागृहाच्या नामफलकाचे अनावरण गिरीश कोळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक सभागृहामध्ये संपन्न झालेल्या मुख्य कार्यक्रमांमध्ये मान्यवरांना यथोचित सन्मानित केल्यानंतर शालेय परिसराला शैलेश रमेश डोळस असे नाव देणे मागचा हेतू श्री अमोल रेडीज यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये स्पष्ट केला. शैलेश रमेश डोळस यांनी संस्थेप्रति केलेल्या योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन संस्थेने त्यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन परिवाराचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती शैलेश रमेश डोळस यांनी आपल्या मनोगतातून शाळेप्रती आपले ऋणानुबंध व्यक्त केले. प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगत मधून शैलेश डोळस यांच्या दातृत्व भावनेचे कौतुक केले. या कार्यक्रमाला तालुकाभरातून अनेक शिक्षणप्रेमी नागरिक पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनोद बंडगर व आभार सचिन कांबळे यांनी मानले. त्यादिवशी सायंकाळी मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर झाला रंगमंचावर दीप प्रज्वलन व नटराजाच्या व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. त्यावेळी शैलेश रमेश डोळस त्यांच्या मित्रमंडळींची त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया A.v माध्यमातून डिजिटल स्क्रीनवर दाखवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले यामध्ये दीप नृत्य लोकनृत्य, दिंडी भारुड, लावणी जाकडी इत्यादी कला गुण दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली, त्यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग, प्रेक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन श्रुतीक प्रभुलकर,व सौ. साक्षी हटकर यांनी केले.आभार सचिन कांबळे यांनी मानले.



