*डी. पी. गवित आयुर्वेद महाविद्यालयात राष्ट्रीय युवक दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी. पी. गवित आयुर्वेद महाविद्यालयात राष्ट्रीय युवक दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*डी. पी. गवित आयुर्वेद महाविद्यालयात राष्ट्रीय युवक दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डी. पी. गवित आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल, नंदुरबार येथे राष्ट्रीय युवक दिनानिमित्त युवक सक्षमीकरण व राष्ट्रनिर्मिती या विषयावर आयोजित विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित असून युवकांमध्ये आत्मविश्वास, शिस्त व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून एम एस सर्जन डॉ. शिरीश कुमार शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांनी आरोग्य, चारित्र्य व परिश्रम यांना जीवनात महत्त्व देत राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे संयोजन डीपी गावित आयुर्वेद कॉलेजच्या विश्वस्त डॉ. विभूती गवित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डी. पी. गवित आयुर्वेद कॉलेज प्राचार्य डॉ. समीर चौधरी यांनी भूषवले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे युवकांच्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.



