*नंदुरबार पालिकेमार्फत सुमारे पाच कोटी 75 लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार पालिकेमार्फत सुमारे पाच कोटी 75 लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन*
*नंदुरबार पालिकेमार्फत सुमारे पाच कोटी 75 लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील नगरपालिकेमार्फत प्रभाग क्रमांक एक व नऊ मधील सुमारे पाच कोटी 75 लाख रुपये निधीचे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी व आचारसंहिता संपल्यानंतर पालिकेचे सत्ताधारी कामाला लागले असून विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक एक व नऊ मधून सुमारे पाच कोटी 75 लाख रुपये निधीच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
नंदुरबार नगरपालिकेमार्फत नागरी आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक एक व नऊ मधील विविध वसाहतींमधील रस्त्यांचे डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन नगरसेवक किरण रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, कुणाल वसावे, ज्योती राजपूत, योगेश राजपूत, कुणाल वसावे, दीपक कटारिया, कमल ठाकूर, योगेश चौधरी, अभियंता गणेश गावित, किशोर वाडीले, बापू शेळके यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. प्रभाग क्रमांक एक व नऊ मधील मधील संयम पार्क, मोडक नगर, तिरुपती नगर, स्वरूपानगर, सिटी पार्क, डि के टाउन, मंथन पार्क, जानकी विहार, जीटीपी कॉलेज जवळील म्हाडा कॉलनी मधील रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभ करण्यात आला.



