*सावित्रीबाई फुले समाजपरिवर्तनाच्या शिल्पकार होत्या- प्रा. डॉ.एम. एस. उभाळे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सावित्रीबाई फुले समाजपरिवर्तनाच्या शिल्पकार होत्या- प्रा. डॉ.एम. एस. उभाळे*
*सावित्रीबाई फुले समाजपरिवर्तनाच्या शिल्पकार होत्या- प्रा. डॉ.एम. एस. उभाळे*
दोंडाईचा(प्रतिनिधी):-"सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक व कवयित्री होत्या.त्यांनी महात्मा फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. जातीय भेदभावाविरुद्ध काम केले. विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. केशवपण प्रथेविरुद्ध आवाज उठवला म्हणून सावित्रीबाई फुले या समाज परिवर्तनाच्या शिल्पकार होत्या" असे प्रा. डॉ. एम. एस. उभाळे यांनी सांगितले. ते सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. श्रीमंतराजे दौलतसिंह रावल बी.एड. कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम प्रास्ताविकातून प्रियंका पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. सुखदेव वसावे, जयश्री ठाकूर, रूपाली बागुल, दीपमाला भामरे यांनी समायोजित मनोगते सादर केले. तसेच उमा पाटील, निलेश चौरे, निकिता रावल, चेतना दातेराव, अजय पवार पूनम धनगर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वर आधारित कविता वाचन सादर केले. प्रा. रवींद्र वळवी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंग सांगून सुस्वर कविता गायन केले. प्रा. डॉ. एम. एस. उभाळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा दिला. सूत्रसंचालन चेतना दातेराव व आभार अभिव्यक्ती निलेश चौरे यांनी केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.एम.एस.उभाळे, प्रा.रवींद्र पाटील, प्रा. निशा ठाकूर, प्रा. रेवती बागुल, प्रा. सुनीता वळवी व प्रा. आर.एस.वळवी यांनी प्रयत्न केले. तर प्रशासकीय सेवक शंकर गिरासे, कृष्णा बागुल, अमर राजपूत व वीरपाल गिरासे सहकार्य केले.



