*काथर्दे खुर्द मराठी शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*काथर्दे खुर्द मराठी शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न*
*काथर्दे खुर्द मराठी शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा, काथर्दे खुर्द ही शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण व उपक्रमशील कार्यक्रम राबविण्यात अग्रेसर राहिली आहे. चार भिंतीतील औपचारिक शिक्षणापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, व्यवहार कौशल्ये, व्यवसायाची ओळख तसेच नफा –तोट्याची संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजावी या उद्देशाने शाळेत ‘बाल आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष मानक चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गौरी वळवी यांची विशेष उपस्थिती लाभली. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी पालकांच्या सहकार्याने विविध चविष्ट पदार्थ तयार करून तब्बल 20 विद्यार्थ्यांनी स्वतंत्र स्टॉल लावून सहभाग नोंदविला. पोंगे बटाटे, वडापाव, भेळ, भजी, पोहे, पराठे, चिक्की, चिवडा आदी पदार्थांची विक्री करत विद्यार्थ्यांनी स्वतः नफा कमावण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यामुळे व्यवहारज्ञान, आर्थिक नियोजन व ग्राहक व्यवहार यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले. यानंतर फुगा बादलीत टाकणे, संगीत खुर्ची, तसेच विविध गाण्यांवर आधारित सांस्कृतिक नृत्यप्रकार विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी दिवसभर आनंद, उत्साह व नव्या अनुभवांचा मनमुराद आनंद घेतला. या कार्यक्रमास श्रमिक माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारी, तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक विजय सोनवणे, तसेच श्रीकांत वसईकर, तुकाराम आलट व शारदा कडवे यांनी विशेष परिश्रम घेतले.



