*भारतीय नाग प्रजातीच्या सापाला वाचविण्यात सर्पमित्रास यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय नाग प्रजातीच्या सापाला वाचविण्यात सर्पमित्रास यश*
*भारतीय नाग प्रजातीच्या सापाला वाचविण्यात सर्पमित्रास यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-1 जानेवारी 2026 नव्या वर्षाचा पहिला दिवशी नंदुरबार सर्पमित्र ओम कोडग व राहुल कोळी यांना नळवा रोडवर असलेल्या कल्याणी पार्कमधील कन्स्ट्रक्शन साईट मधून कॉल आला असता तेथे एक जखमी साप असल्याची माहिती लोकांनी सर्पमित्रांनी दिली. सर्पमित्रांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली असता त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथे विषारी जातीचा साप (भारतीय नाग) JCB मुळे जखमी अवस्थेत आढळून आला व त्या सापाला सर्पमित्रांनी सुखरूप रेस्क्यू करून सापाला उपचाराकरिता नंदुरबार पशुवैद्यकीय सरकारी रुग्णालयात आणले व सापावर प्राथमिक उपचार करून झाल्यानंतर सापाला सुखरूप त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून त्या विषारी सापाचे (भारतीय नाग) जीव वाचवले.



