*नंदुरबार तालुका विधायक समिती, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथे नाविन्यपूर्ण उपक्रम बालसभा निमित्ताने बालकांनी गाजवले व्यासपीठ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुका विधायक समिती, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथे नाविन्यपूर्ण उपक्रम बालसभा निमित्ताने बालकांनी गाजवले व्यासपीठ*
*नंदुरबार तालुका विधायक समिती, साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ तालुका जिल्हा नंदुरबार येथे नाविन्यपूर्ण उपक्रम बालसभा निमित्ताने बालकांनी गाजवले व्यासपीठ*
नंदूरबार(प्रतिनिधी):-साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शनिमांडळ येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य कुंदन पाटील पर्यवेक्षक पि यू आव्हाड व उपक्रमशील शिक्षिका बी आर वाघ यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम बालसभा घेऊन विद्यार्थ्यांनी गाजविले व्यासपीठ
यावेळेस विद्यालयातील इयत्ता सहावीच्या वर्गातील संपूर्ण विद्यार्थी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व मनोगत व्यक्त करणारे म्हणून स्थानापन्न झाले. या बालसभेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता सहावीचा विद्यार्थी खगेंद्र पाटील याची सर्वानुमते निवड करण्यात आली त्यानंतर प्रमुख वक्ते म्हणून इयत्ता सहावीचा विद्यार्थी कृष्णा पाटील यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते व इतर सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते जे थोर व्यक्ती आपल्या जीवनात आपल्याला मेहनत, धैर्य, चांगले संस्कार शिकविले अशा थोर व्यक्तींचं आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. इयत्ता सहावी च्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाचे वातावरण मंत्रमुग्ध करून स्वागत केले.
यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत आई-वडिलांबद्दल आदर- प्रेम बाळगणे, परिवाराचे महत्त्व, एकतेचे महत्व, सर्व धर्म समभाव, पारिवारिक विचार - चर्चा - सर्वानुमती नियोजन व निर्णय घेणे असे विविध मुद्द्या वर माहिती दिली. मोहित पाटील, प्रथमेश राजपूत, कल्पेश पाटील, धनंजय पाटील, कुलदीप पाटील, गणेश भील, जीविका हाटकर, नेहा कोळी, योगेश माळी, कंचन पाटील, प्रेक्षा राजपूत, तेजस्विनी खैरनार, तमन्ना राजपूत, कुमुदिनी राजपूत, दिव्या राजपूत, नीलिमा सोनवणे, शुभम पानपाटील, फुलबाई भील व भारती भील
यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी साधना विद्यालय येथील पर्यवेक्षक पि यू आव्हाड यांनी कार्यक्रमाचे उद्देश विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण- सर्जनशीलता - शिस्त आणि सहकार्य वाढवणे हे विकसित व्हावे आणि विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास, आत्मविश्वास आणि चांगला व्यक्तिमत्व घडवण्यात साठी हा सुंदर मंच उपस्थित करून कार्यक्रमाचे उद्देश विद्यार्थ्यांना सांगितले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीचा विद्यार्थी भावेश माळी यांने केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राजक्ता माळी हिने केले.



