*नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित, महिला बचत गटाच्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते उद्घाटन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित, महिला बचत गटाच्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते उद्घाटन*
*नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित, महिला बचत गटाच्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचा जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते उद्घाटन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) पुरस्कृत व डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार संचलित पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मौजे श्रावणी ता. नवापूर जि. नंदुरबार येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या उद्योगाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी त्यांनी संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेत प्रकल्पाची कार्यपद्धती समजून घेतली तसेच युनिटची पाहणी केली. या सोयाबीन प्रक्रिया उद्योगासाठी कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारचे तांत्रिक सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास व्यासपीठावर जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, नाबार्ड जिल्हा विकास प्रबंधक (DDM) रविंद्र मोरे, डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी नंदकुमार पैठणकर तसेच पाणलोट क्षेत्र विकास समिती, श्रावणीचे अध्यक्ष संदीप कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक कृषी उत्पादनावर प्रक्रिया केल्यास त्यापासून चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. नंदुरबार जिल्ह्यात यासाठी अनेक संधी आहेत अशा संधीचा शेतकऱ्यांनी आणि महिला बचत गटांनी लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी यावेळी केले.
नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक रवींद्र मोरे यांनी महिला बचत गटाच्या या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचे कौतुक करीत व्यवसायात सातत्य ठेवून विक्री व्यवस्थापनावर भर द्यावा असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी होत असलेल्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधणाऱ्या एकात्म मानव दर्शनाच्या दृष्टीकोनातून कार्य करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमास सायली वर्मा, सेंट्रल किचन, नंदुरबार, कोसे प्राचार्य नवोदय विद्यालय श्रावणी, उमेदचे यशवंत ठाकूर, राजेंद्र दहातोंडे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख,
कृषी विज्ञान केंद्र, कोळदा, तालुका कृषि अधिकारी रवींद्र पाडवी, कृषि विज्ञान केंद्र नंदुरबारच्या गृहविज्ञान तज्ञ सौ. आरती देशमुख यांची उपस्थिती लाभली. श्रावणी गावातील महिला बचत गट ग्रामसंघाअंतर्गत विविध स्वयंरोजगार उद्योग सुरू करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारण्यात आला आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मोठी मदत होणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ जयंत उत्तरवार यांनी नाबार्डच्या या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत झालेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पवार केले. श्रावणी येथील बचत गटाच्या महिलांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी सोयाबीन पासून बनविलेल्या विविध प्रक्रिया पदार्थ तसेच कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले. यात प्रकल्पातील शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातील उपक्रमांचे फायदे जाणून घेतले.
यावेळी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त यशपाल पटेल, सौ. अर्चना वळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार, नाबार्ड प्रकल्प व कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथील संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले.



