*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट संपन्न*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्र, वनऔषधी केंद्र तसेच आयुष्यमान भारत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दि. 1 जानेवारी 2026 रोजी एकदिवसीय शैक्षणिक भेट यशस्वीरीत्या संपन्न झाली. या शैक्षणिक भेटीत एकूण 40 विद्यार्थी सहभागी झाले होते. ही भेट PCI च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार (ER-2020) राबविण्यात आली.
या शैक्षणिक भेटीची सुरुवात आयुष्यमान भारत प्राथमिक आरोग्य केंद्र, लहान शहादे येथे झाली. येथे विद्यार्थ्यांनी औषध भांडार, औषध वितरण विभाग, महा लॅब, प्रसूतीगृह, डे-केअर रूम आदी विविध विभागांना भेट देऊन प्रत्यक्ष कार्यपद्धतीची माहिती घेतली. तसेच डॉक्टर, परिचारिका (सिस्टर), आरोग्य सहाय्यक, फार्मसिस्ट व प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या कामकाजाच्या विविध पद्धती विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या. यावेळी काही रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्य समस्यांचीही माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. यानंतर विद्यार्थ्यांनी कोळदा येथील कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली. या भेटीदरम्यान औषधी वनस्पती विभाग, सेंद्रिय शेती पद्धती, मधुमाशी पालन, सेंद्रिय खत व्यवस्थापन, हवामान मोजमाप केंद्र, किसान सेवा केंद्र तसेच रेडिओ स्टेशन अशा विविध विभागांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेती, पर्यावरण व औषधी वनस्पती यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. या शैक्षणिक भेटीस महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील व संस्थेचे सचिव गणेश गोविंद पाटील यांनी या उपक्रमास प्रोत्साहन दिले. सदर शैक्षणिक भेट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडून त्यांना व्यावसायिक क्षेत्राची प्रत्यक्ष ओळख मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



