*शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धेत,नाशिक विभागाच्या संगीत वाद्य वादन स्पर्धेत,श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिर तळोदा येथील सचिन पाटील यांची राज्यपातळीव
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धेत,नाशिक विभागाच्या संगीत वाद्य वादन स्पर्धेत,श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिर तळोदा येथील सचिन पाटील यांची राज्यपातळीव
*शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धेत,नाशिक विभागाच्या संगीत वाद्य वादन स्पर्धेत,श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिर तळोदा येथील सचिन पाटील यांची राज्यपातळीवर होणाऱ्या स्पर्धेतनिवड*
तळोदा(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासन शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धेत नाशिक विभागाच्या संगीत वाद्य वादन स्पर्धेत श्रीमोती प्राथमिक विद्यामंदिर तळोदा येथील सचिन नारायण पाटील यांची राज्य पातळीवर होणाऱ्या स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध विभागातून स्पर्धक सहभागी होणार असून त्यात शिक्षकांमध्ये असलेले सुप्त गुण हे विकसित व्हावेत, शिक्षकांमध्ये असलेल्या कला गुणांना वाव मिळावा व त्यांचा विद्यार्थ्यांच्या अध्यापनात वापर करण्यात यावा हा हेतू महाराष्ट्र शासनाने दृष्टी ठेवून विविध प्रकारच्या स्पर्धा ह्या ठेवल्या होत्या, त्यात संगीत वाद्य वादनात सचिन पाटील यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. तसेच हिंदी, मराठी पत्रकार संघतर्फे सचिन पाटील यांना दर्पणरत्न पुरस्कार 2026 हा राज्य पातळीवर असणारा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. सदरील बाबींमुळे महावीर ज्ञानप्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष निखिल तुरखिया, संचालिका सौ सोना तुरखिया, संस्थेचे समन्वयक हर्षल तुरखिया, संस्थेचे उपाध्यक्ष डी एम महाले, संस्थेचे सचिव संजय पटेल, तसेच मुख्याध्यापक वृंद व शिक्षक व शिकेतर कर्मचारी वृंद तसेच प्राथमिक शिक्षण विभाग तळोदा तालुका गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्याकडून कौतुक करण्यात येत आहे.



