*दापोलीतील दमामे येथे बालदिनानिमित्त शालेय अंतर्गत विविध स्पर्धां उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दापोलीतील दमामे येथे बालदिनानिमित्त शालेय अंतर्गत विविध स्पर्धां उत्साहात संपन्न*
*दापोलीतील दमामे येथे बालदिनानिमित्त शालेय अंतर्गत विविध स्पर्धां उत्साहात संपन्न*
दापोली(प्रतिनिधी):-श्री धाराई जाखमाता विकास मंडळसह सुविधा महिला मंडळ व संयुक्त युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालदिनाचे औचित्य साधून दि. 20 डिसेंबर रोजी शालेय अंतर्गत चित्रकला, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा तसेच वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपली कला, बुद्धिमत्ता व आत्मविश्वास सादर केला. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या अभावामुळे शाळा बंद पडण्याचे प्रमाण वाढत असताना, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत गोडी निर्माण होऊन नवचैतन्य येत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेतच अशा उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा संकल्प मंडळाच्या युवकांनी प्रत्यक्षात उतरवला असून हा उपक्रम समाजोपयोगी ठरत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी
युवा कमिटी अध्यक्ष विकास जाधव, उपाध्यक्ष दिनेश बारे, शिक्षण कमिटी प्रमुख रोशन निकम, राकेश बारे, सौरभ बारे, सचिव प्रविण जाधव, क्रीडा कमिटी प्रमुख कल्पेश निकम,
युवकांचे मार्गदर्शक मदन जाधव,
तसेच सतिष पड्याळ, संदेश जाधव, प्रदीप विटमल, अक्षय निकम, कैलास निकम, स्वप्नील जाधव, शैलेश निकम, विजय विटमल, सुरज निकम, ओंकार बारे व गणेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे ग्रामिण अध्यक्ष शरद विटमल, माजी अध्यक्ष जानू जाधव व माजी अध्यक्ष अनंत पड्याळ यांनी कौतुक केले.
कार्यक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूल, दमामे चे मुख्याध्यापक पिटले सर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच जि. प. शाळा, दमामे च्या मुख्याध्यापिका सौ. निलीमा धोपावकर, कुलाल व इतर शिक्षकांनीही मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी पिटले यांनी मंडळाच्या एकजुटीचे व उत्कृष्ट नियोजनाचे विशेष कौतुक करून आभार मानले. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन निखिल हरावडे यांनी केले.



