*नंदुरबार जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक आचारसंहिता संदर्भात बातमी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक आचारसंहिता संदर्भात बातमी*
*नंदुरबार जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक आचारसंहिता संदर्भात बातमी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्राने जारी केलेल्या आदेशानुसार नगरपरिषद व नगरपंचायती सार्वत्रिक निवडणुका-2025 अनुषंगाने लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता आता संपुष्टात आली आहे.
आयोगाने 288 नगरपरिषद/नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, नवापूर व तळोदा या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या असून, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया 21 डिसेंबर 2025 रोजी पूर्ण झाली आहे. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ नागपूर तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू होती. आता निकाल जाहीर झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता संपुष्टात आली आहे.
यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना नियमित प्रशासकीय व विकासात्मक कामकाज सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.



