*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण*
*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅबलेटचे वितरण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), यांच्यामार्फत निवड झालेल्या जेईई/एनईईटी/एमएचटी -सीईटी (JEE/NEET/MHT- CET) ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले, अभ्यासक्रम लोड केलेले टॅबलेट जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी बोलतांना म्हणाल्या की, महाज्योतीच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक साधने उपलब्ध होत असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना भविष्यातील संधींसाठी सक्षम करण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. विद्यार्थ्यांनी या टॅबचा उपयोग केवळ अभ्यासासाठी करावा व आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्याने परिश्रम घ्यावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती सेठी यांनी यावेळी केले.



