*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी, 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ- संजय पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी, 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ- संजय पाटील*
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी, 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ- संजय पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) माध्यमातुन आधार ऑथेंटिकेशन (Aadhaar Authentication) करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
योजनेचा उद्देश:
राज्यातील महिलांचे आरोग्य व पोषण सुधारणे. कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे. पात्र महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
अनाथ, घटस्फोटित किंवा एकल महिलांसाठी विशेष सूचना, ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, पती देखील हयात नाहीत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, त्यांनी स्वतःचे ई-केवायसी (e-KYC) करावे. त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांचेकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करावी. चुका दुरुस्त करण्याची अंतिम संधी: ज्या पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु त्यांच्याकडून पर्याय निवडतांना चुका झाल्या असतील, अशा लाभार्थ्यांना पुनश्च वेब पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची (चुका दुरुस्त करण्यासाठी) एक अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यांनी स्वतः वेब पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करून घ्यायची आहे. असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



