*नंदुरबार जिल्हा परिषदेचा मनमानी कारभार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा परिषदेचा मनमानी कारभार*
*नंदुरबार जिल्हा परिषदेचा मनमानी कारभार*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये बोगस दिव्यांग आढळून देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने त्यांच्यावर दिव्यांग अधिनियम 2016 च्या कलम 91 नुसार कारवाई करणे आवश्यक असतांना संबंधितांना पाठिशी घालत असल्याचे दिसून येत आहे. दिव्यांग अधिनिमय 2016 व दिव्यांग आयुक्त, मुंबई यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत केवळ देखावा करत आहे. दोषी अधिकारी यांना पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न जिल्हा परिषद प्रशासन करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या बोगस दिव्यांगा बाबत आवाज उठविणारे दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी मंगेश वाघमारे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांना सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी हे वारंवार दबाव आणत दमदाटी करत त्यांना त्रास देत असून महाराष्ट्र राज्य दिव्यांग महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे तक्रार दाखल करून बोगस दिव्यांग कर्मचारी हे, मंगेश वाघमारे यांच्यावर कार्यालयात दबाव आणणारे सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदर मागणीची दखल न घेतल्यास संघटनेमार्फत आंदोलन करू न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्यासाठी जाणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे. विशेषत: संपुर्ण महाराष्ट्रात बोगस दिव्यांगांवर कारवाई करण्यात येत असतांना जिल्हा प्रशासन मात्र संबंधितांवर काहीच कारवाई करत नसल्याने
नाराजी व्यक्त होत आहे.



