*भेसळयुक्त ताडीची अवैधरित्या निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुध्द जिल्हयाभरात कारवाई*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भेसळयुक्त ताडीची अवैधरित्या निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुध्द जिल्हयाभरात कारवाई*
*भेसळयुक्त ताडीची अवैधरित्या निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुध्द जिल्हयाभरात कारवाई*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयात भेसळयुक्त ताडीची अवैधरित्या निर्मिती व विक्री करणाऱ्या इसमांविरुध्द विशेष मोहिम राबविण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत तसेच स्थानिक गुन्हे शाखेमार्फतीने विविध ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त ताडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, तयार ताडी तसेच विक्रीसाठी ठेवलेले स्टॉक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेवर विविध पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123, 275 सह महा. दारुबंदी अधिनियम कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार शहर पोलीस ठाणे, शहादा पोलीस ठाणे, तळोदा पोलीस ठाणे यांचेतर्फे करण्यात आली असुन त्यामध्ये मानवी जिवीतास व आरोग्यास अपायकारक अशा विनापरवाना भेसळयुक्त ताडी बनवुन तिची विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात येऊन त्यांचेकडुन एकुण 23,180 रुपयांचा मुद्देमाल त्यात एकुण 487 लिटर भेसळयुक्त ताडी व ताडी बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असे जप्त करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भेसळयुक्त ताडी अगर इतर कोणतेही अवैध मदयनिर्मिती/विक्री संबंधी माहिती असल्यास कृपया जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल 112 वर माहिती दयावी. तुमची ओळख ही गोपनिय ठेवण्यात येईल.



