*सातपुड्यातील जामली येथे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून साकारला वनराई बंधारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सातपुड्यातील जामली येथे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून साकारला वनराई बंधारा*
*सातपुड्यातील जामली येथे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून साकारला वनराई बंधारा* अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यातील जामली येथे कृषी विभागाच्यावतीने सातपुड्यातील जामली येथील नदीवर कृषी विभागाच्या कर्मचारी व गावकऱ्यांच्या मदतीने श्रमदानातुन 'पाणी अडवा, पाणी जिरवा' उपक्रमातुन वनराई बंधारा बांधण्यात आला. गावकऱ्यांच्या मदतीने पावसाळा संपल्यानंतर काही दिवस नदीचे वाहत असलेले पाणी अडवण्यासाठी कमी खर्चात सिमेंटच्या खाली गोण्यांमधे वाळू भरून त्या गोण्यांचा वापर करीत कमी खर्चात बंधारा बांधला. अडवलेले पाणी काही वनराई बंधाऱ्यामुळे सुमारे 70-80 मीटरपर्यंत पाणी अडवले गेले आहे. या पाण्याने सुरक्षित शेती म्हणुन रब्बी ज्वारी, हरबरा भाजीपाला पिकाला पाणी देऊ शकणार असून पाळीव जनावरे पशु पक्षी, वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची काही दिवस सोय होईल, आजुबाजुच्या शेतकऱ्यांची विहीर, इंधन विहिरी यांचे पाणी पातळी वाढेल. नदी- नाल्यावरील पाण्याचा प्रवाह पारंपारिक पध्दतीने अडवुन रब्बी हंगामात पाण्याची गरज काहीअंशी भागविण्यासाठी वनराई बंधारा उपयोगी पडणार आहे. यावेळी उप कृषि अधिकारी व्हि. एस. कदम, सहाय्यक कृषी अधिकारी बी.बी. वसावे, बी. आर . वसावे सामाजिक कार्यकर्ता अजय करणसिंग तडवी व ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.



