*आरोग्य विभागाच्या अडचणी समजून घेऊन तातडीने त्यावर उपाय योजना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची बैठक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आरोग्य विभागाच्या अडचणी समजून घेऊन तातडीने त्यावर उपाय योजना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची बैठक*
*आरोग्य विभागाच्या अडचणी समजून घेऊन तातडीने त्यावर उपाय योजना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची बैठक*
नंदूरबार(प्रतिनिधी):-आरोग्य विभागाच्या अडचणी समजून घेऊन तातडीने त्यावर उपाय योजना करण्यासाठी 11 डिसेंबर रोजी नागपूर येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्व पुर्ण बैठक घेतली. यावेळी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदार संघांचे आमदार आमश्या पाडवी यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदार संघात आरोग्याच्या भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करुन त्यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली. यावेळी अक्कलकुवा, मोलगी येथे मंजुरी देण्यात आलेले उप जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीं बांधकामांना मंजुरी देऊन रुग्णालय कार्यान्वित करणे, जिल्हा रुग्णालय व जिल्ह्यातील सर्व ग्रामिण रुग्णालयातील सर्व रिक्त पदांची भरती करणे, मेळघाट पॅटर्न नुसार अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी दोन रुग्णवाहीका देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व रिक्त पदे भरणे, तसेच खापर, बिलगाव, काकडदा येथे मंजुर असलेली ग्रामिण रुग्णालये तातडीने कार्यान्वित करणे, आदी मागण्या मांडल्यात यावर आरोग्य मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या पुर्ण करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात. यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, आमदार आमश्या पाडवी यांचे स्विय सहाय्यक सुधीरकुमार ब्राम्हणे आदी उपस्थित होते.



